For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ajit Pawar : दादा पर्व संपलं; राजकारणात न भरून येणारी पोकळी

06:59 PM Jan 28, 2026 IST | NEETA POTDAR
ajit pawar   दादा पर्व संपलं  राजकारणात न भरून येणारी पोकळी
Advertisement

                                                  दादा पर्वाचा दुर्दैवी अंत

Advertisement

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लैंडिंग होताना भीषण अपघात झाला. विमान लैंडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्नु अनावर झाले. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे. राज्याच्या अर्थ खात्याची धुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती. प्रशासनावर पकड असलेला धुरंदर नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधकडपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार.

Advertisement

विमान लॉडिंग होत असतानाच अपघात राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे आज अजित पवार यांच्चा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प - स्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लॉडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते. त्या सर्वाचा मृत्यू झाला.

दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त
अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प णज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या 'दादा' पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चिलं गेलं आहे. त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे.

साडे चार वशकांपासून राजकारणात
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प वरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला.

त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले. अजित पवार यांनी १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

Advertisement
Tags :

.