For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यमान शिक्षण उन्नती पॅनेलचीच बाजी

11:32 AM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
विद्यमान शिक्षण उन्नती पॅनेलचीच बाजी
Advertisement

मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ निवडणूक : डॉ. किरण ठाकुर, साईनाथ चव्हाण पुरस्कृत पॅनेलचे 9-2 ने  दणदणीत वर्चस्व

Advertisement

मालवण : येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ. किरण ठाकुर व साईनाथ चव्हाण पुरस्कृत शिक्षण उन्नती पॅनेलने माजी विद्यार्थी संघटना व हितचिंतक पुरस्कृत पॅनेलचा 9 विरुद्ध 2 अशा जागांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. याआधी शिक्षण उन्नती पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. किरण ठाकुर व कार्याध्यक्षपदाचे उमेदवार साईनाथ चव्हाण बिनविरोध निवडले होते. रविवारी झालेल्या 9 जागांच्या निवडणुकीत शिक्षण उन्नती पॅनेलचे 7 तर माजी विद्यार्थी संघटना पॅनेलचे 2 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत 524 मतदारांपैकी 296 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथील कन्या शाळेत मतदान व मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणच्या विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान शांततेत पार पडले.  सायंकाळी मतमोजणी झाली. प्रथम सदस्यपदाची मतमोजणी झाल्यानंतर वैयक्तिक पदाची मतमोजणी घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालाची अधिकृत घोषणा 17 ऑगस्टला होणाऱ्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.

निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे

Advertisement

कार्यवाह- चंद्रशेखर उर्फ गणेश रजनीकांत कुशे (162 विजयी), सुरेश मधुकर परब (130). या विभागात 296 मतदान झाले. चार मते बाद ठरली. सहकार्यवाह- संदेश रामचंद्र कोयंडे (148 विजयी), विजय प्रताप केनवडेकर (143). या विभागात 296 मतदान झाले होते. यात पाच मते बाद ठरली होती. कोषाध्यक्ष- नंदन सीताराम देसाई (169 विजयी), विठ्ठल बाबू पटकारे (124). या विभागात 296 मतदान झाले होते. यात तीन मते बाद ठरली होती. सदस्यपदासाठी रामचंद्र नानासाहेब काटकर (143 विजयी), राजेंद्र देविदास खांडाळेकर (150 विजयी), अॅड. समीर सुरेश गवाणकर (167 विजयी), डॉ. शशिकांत जगजीवन झांट्यो (155 विजयी), महादेव सत्यवान पाटकर (140 विजयी), शैलेश सुरेश पावसकर (147 विजयी). महेश अंधारी (120), प्रमोद ओरसकर (137), महेश काळसेकर (128), दीपक पाटकर (137), नितीन वाळके (126), अंजली हडकर (110). या विभागात 296 मतदान झाले होते. त्यातील 14 मते बाद ठरली होती. निवडणूक प्रक्रियेत साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवप्रसाद चौकेकर, केंद्राध्यक्ष अतुल मालंडकर, मतदान अधिकारी राधिका हळदणकर, नम्रता साळकर, सान्वी शेटये, राजाराम कांदळगावकर, गंगाराम सावंत यांनी काम पाहिले.

शिक्षण उन्नती पॅनेलचा जल्लोष

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विद्यमान पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केल्यानंतर विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पॅनेलने 11 पैकी 9 जागांवर विजय संपादन केला आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर आणि साईनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विजय संपादन करण्यात आल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली.

Advertisement
Tags :

.