ठार करण्याची सर्वात क्रूर पद्धत
कांस्याच्या बैलाचा करायचे वापर
मृत्यू कुठल्याही प्रकारचा असो, भयानकच असतो. परंतु मृत्यूची पद्धत मरत असलेल्या व्यक्तीच स्थिती सोपी किंवा अवघड करत असते. कुणी झोपेत मृत्यूमुखी पडल्यास किंवा अचानक हृदय बंद पडल्यास ते दृश्य तितके भयानक नसते, परंतु एखाद्याला जाळून, तडफडवून मारून टाकल्यास ते अत्यंत भयावह असते. इतिहासात एक असे उपकरण तयार करण्यात आले होते, जे मारण्यासाठी इतके धोकादायक होते, की त्याविषयी ऐकल्यावरच अंगावर काटा येऊ शकतो.
ब्रॅजन बुल ही अत्यंत भयावह आणि अमानवीय पद्धत अत्यंत कमीच पाहिली गेली आहे. या शिक्षेचा उद्देश एखाद्याला केवळ मारून टाकणे नव्हे तर लोकांच्या मनात भय निर्माण करणे होता. ब्रॅजन बुलची सुरुवात प्राचनी ग्रीसमध्ये झाली होती. हा एक जिवंत आकाराचा पोकळ बैल होता, जो कांस्य धातूने निर्माण केला जायचा. बाहेरून हा पाहण्यास साधारण मूर्तीसारखा होता, परंतु याच्या आत माणसाला टाकून जिवंत जाळले जात होते.
कहाण्यांनुसार सुमारे ख्रिस्तपूर्व 6 व्या शतकात अथेन्सचा एक कारागिल पेरिलाउसने याची निर्मिती केली होती. त्याने हे उपकरण सिसिलीच्या अक्रागस शहराचा शासक फालारिसला सोपविले होते. फालारिस स्वत:चा अत्याचार आणि निर्दयतेसाठी कुख्यात होता. पेरिलाउसने या उपकरणाला गुन्हेगारांना घाबरविणे आणि कठोर शिक्षा देण्यासाठी ‘सर्वात प्रभावी पद्धत’ ठरविले होते.
जो व्यक्ती या बैलाच्या आत बंद केला जात होता, त्याच्यासाठी मृत्यू अत्यंत वेदनादायी होता, बैलाच्या खालून आग लावली जात होती, ज्यामुळे कांस्याची रचना हळूहळू तापू लागत होती. आत कैद माणूस जिवंत होरपळला जात होता आणि मृत्यू होत नाही तोवर तो पूर्णपणे शुद्धीत असायचा. या बैलाची सर्वात भीतीदायक गोष्ट त्याचे शीर होते. बैलाच्या शिरात खास प्रकारच्या नळ्या आणि मार्ग तयार करण्यात आले होते. आतील व्यक्तीने वेदनेने ओरडायचा, तेव्हा त्याचा आक्रोश बाहेर पडून संतप्त बैलाच्या ओरडण्यासारखा ऐकू येतो.
लोकांना ऐकू येतो आक्रोश
बाहेर उभ्या असलेल्या लोकांना एखादा प्राणी आवाज काढत असल्याचे वाटायचे. अशाप्रकारे मानवी पीडेला एका भीतीदायक तमाशात बदलण्यात आले होते. फालारिसला हे उपकरण इतके पसंत पडले होते, की त्याने सर्वप्रथम याचा निर्माता पेरिलाउसवरच याला आजमाविण्याचा निर्णय घेतला होता. पेरिलाउसने स्वत: बैलाला ऑपरेट करण्याची पद्धत समजाविली आणि मगच त्याला आतमध्ये टाकण्यात आले. परंतु फालारिसने त्याला पूर्णपणे जाळण्यापूर्वी बाहेर काढण्याचा आदेश दिला होता, परंतु निर्दयता येथेच संपली नाही. नंतर फालारिसने स्वत:च्या शिपायांना पेरिलाउसला पर्वतांवरुन खाली फेकण्याचा आदेश दिला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.