वृद्ध आईवडिलांना मारण्याची क्रूर परंपरा
ठलाईकूठल नावाच्या क्रूर परंपरेमागे गरीबी कारणीभूत
भारत हा विविधतांनी नटलेला देश असल्याचे बोलले जाते. या देशात काही अंतरानंतर भाषा, आहारपद्धती, वेशभूषा प्रथापरंपरा, मान्यता इत्यादी बदलत असतात. तामिळनाडू या राज्यातील एक परंपरा सर्वात धक्कादायक होती. येथे पुत्रच स्वत:च्या आजारी आईवडिलांना मारून टाकायचा. ठलाईकूठल नावाची परंपरा तामिळनाडूच्या दक्षिण हिस्स्यांमध्ये होती. येथे मुलेच स्वत:च्या वृद्ध आणि आजारी आईवडिलांना मारून टाकत होते. या प्रथेला इंग्रजीत ‘सेनिसाइड’ या नावाने देखील ओळखले जाते. याचा अर्थ वृद्धांना मारणे असा होतो. ही प्रथा गरीबी आणि परंपरेचे मिश्रण आहे.
या परंपरेत अशा वृद्धांना ठार केले जायचे, जे मृत्यूपंथावर असायचे किंवा कोमाच्या स्थितीत असायचे. अखेरचे श्वास मोजणाऱ्या वृद्धांना मारण्यापूर्वी सर्वप्रथम त्यांना तेलाद्वारे अंघोळ घातली जायची, त्यानंतर तुळशीच्या पानांचा रस तसेच दूध दिले जायचे. या पूर्ण ड्रिंकला मृत्यूपूर्वीचे ड्रिंक मानले जायचे. अशाप्रकारे त्यांच्या शरीराचे तापमान वेगाने कमी व्हायचे आणि मोठ्या प्रमाणात थंडी वाजू लागायची किंवा हार्ट अटॅक यायचा यामुळे वृद्धांचा मृत्यू ओढवत होता.
याचबरोबर त्यांना मुरुक्कू नावाची जिलेबीसारखी डिश खाण्यास दिली जायची, जी अत्यंत कठोर असायची, ती गळ्यात अडकत असल्याने मृत्यू व्हायचा. एवढेच नव्हे तर काही वृद्धांना थंड पाण्याने अंघोळ घातली जायची. मारण्याची सर्वात उपयुक्त पद्धत वृद्धाचे पोट बिघडविणे होती. त्यांना पाण्यात माती मिसळून पिण्यास दिले जायचे, यामुळे पोट बिघडायचे आणि शरीर अखेरचा श्वास घ्याचे. या सर्व प्रकारांदरम्यान अंत्यंसंस्काराची तयारी केली जात होती. या प्रथेच्या पालनामागे प्रामुख्याने गरीबी हे कारण असायचे.