For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळाशिल बंधाऱ्याचे श्रेय हे गाव वाचवणाऱ्या राणे कुटूंबालाच

03:21 PM Feb 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तळाशिल बंधाऱ्याचे श्रेय हे गाव वाचवणाऱ्या राणे कुटूंबालाच
Advertisement

ग्रामस्थांनी मानले आभार ; उर्वरित मंजूर बंधाऱ्याचे कामही लवकर चालू करण्याची मागणी

Advertisement

आचरा : प्रतिनिधी
फोटो : परेश सावंत

चारी बाजूंनी पाण्याने वेढलेल्या तळाशिल भागाला संकटमोचन खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे हेच ठरत आले आहेत. सध्या झालेला संरक्षक बंधारा, तळाशिल भागात आलेला रस्ता ही राणेंचीच कृपा असून लवकरच उर्वरित संरक्षक बंधारा बांधून तळाशिल ग्रामस्थांना सुरक्षित करतील असा ठाम विश्वास तळाशिल ग्रामस्थांनी एकत्र येत तळाशिल येथे व्यक्त केला. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे पत्रकार परिषद घेत आभार व्यक्त केले. तळाशिल उर्वरित भागातील बंधारा मंजूर असताना तसेच निवडणुकी दरम्यान आणि पूर्वी आश्वासित केलेल्या उर्वरित बंधा-याचे काम कधी सुरु होणार अशा आशयाचा व्हिडिओ फिरु लागल्याने त्याला उत्तर देण्यासाठी तळाशील ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळी तळाशिल ग्रामस्थांनी एकत्र येत पत्रकारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement

यावेळी संजय तारी यांनी 90-91च्या सुमारापासून तळाशिल भागाला पावसाळ्यात उधाणाचा फटका नेहमीच बसत आला आहे. पावसाळ्यातील उधाणात तळाशिल भूभाग समुद्राच्या अजस्र लाटांमध्ये गिळंकृत होण्याची भिती निर्माण झाली होती. यावेळी खासदार नारायण राणे यांनी हा भाग आपल्या मतदार संघात नसतानाही या भागासाठी यू टाईप बंधारा आणि रस्ता उपलब्ध करुन देवून आम्हाला सुरक्षित केले होते याची आठवण करून दिली. माजी सरपंच संजय केळूस्कर यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी उधाणात तळाशिल धोक्यात असताना 70-80 डंपर दगड टाकून आम्हाला सुरक्षित केले होते. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी धाव घेत कोणत्याही शासकीय निधीची वाट न बघता काळे दगड उपलब्ध होत नसतानाही आपल्या खाणीवरुन आणत तळाशिल ग्रामस्थांना सुरक्षित केले होते.

उर्वरित बंधाराही येणाऱ्या काळात पूर्ण होणार : ग्रामस्थ

अंदाजित 14 कोटींचा बंधारा मंजूर असून काही दिवसातच त्याचेही काम चालू होणार आहे असे आमदार राणे यांनी आश्वस्थ केले आहे. त्यामुळे कोणीही अफवा पसरू नये व अफवांना बळी पडू नये. उर्वरित राहिलेल्या भागातील बंधारा तातडीने पूर्ण व्हावा अशीही आमची मागणी आहेच आमचा आवाज शासनाकडे पोहोचवण्यासाठी आम्ही जमलो असल्याचे सांगत आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संकटकाळी धावून येत जे सहकार्य केल्याबद्दल आजही आम्ही ऋणी असून त्याचे आभार व्यक्त करतो असे म्हणाले यावेळी जान्हवी पराडकर,कांदळगावकर आदींसह उपस्थित तळाशिल ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांसह दत्ता सामंत, मालवण उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांचे आभार व्यक्त करत उर्वरित भूभागाला संरक्षित बंधारा बांधून पावसाळ्यापुर्वी तळाशिल वासियांना पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत आम्हाला सुरक्षित करतील असा ठाम विश्वास तळाशिल ग्रामस्थांनी एकत्र येत व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.