For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाइन व्यवहाराची गावांमध्ये वाढतेय क्रेझ !

05:58 PM Dec 13, 2024 IST | Radhika Patil
ऑनलाइन व्यवहाराची गावांमध्ये वाढतेय क्रेझ
The craze for online transactions is growing in villages!
Advertisement

कागल : 

Advertisement

शहरासह ग्रामीण भागात डिजिटल इंडियाचा स्वीकार करत स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक नागरिक विविध कामे करू लागली आहेत. त्यातच इंटरनेटच्या माध्यमातून वीजबिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, एकमेकांना पैसे पाठवणे आणि खरेदी-विक्रीसाठी यूपीआय अगर ऑनलाईन व्यवहार वाढले आहे. त्यामुळे रोख रकमेची आवश्यकता कमी प्रमाणात लागत असल्याने एटीएम केंद्राबाहेर गर्दी ओसरली आहे.

बदलत्या काळानुसार नागरिक झपाट्याने विकसित होण्राया तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. शहरासह गाव-खेड्यांमध्येही ऑनलाइन व्यवहार करण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कॅशलेसचा वापर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, ऑनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहेत. परिणामी, एटीएम कार्डचा वापर कमी होऊ लागला आहे. लहान-मोठी खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला रोकड न देता वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन भरणा केला जात आहे. मोबाइलच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी गुगल पे, पेटीएम, फोन पे, यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अनेकांनी हे वेगवेगळे ?प डाऊनलोड करून घेतले आहेत. यूपीआय अंतर्गत येण्राया सर्व प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या खुबीने केला जात आहे. त्यामुळे एटीएम मशीनमध्ये सहसा नागरिकांची गर्दी दिसून येत नाही.

Advertisement

ऑनलाइन व्यवहारांमुळे बँकेतून रोकड काढण्रायांची संख्या रोडावली असली, तरी याचा सर्वाधिक परिणाम एटीएमवर झाला आहे. शहरातील एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आता कमी होऊ लागली आहे. एकेकाळी रोकड काढण्यासाठी ग्राहकांनी गजबजलेल्या एटीएममध्ये सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एटीएम किंवा बँकेत जाऊन वेळेचा अपव्यय करण्याची इच्छा नागरिकांमध्ये राहिलेली नाही. एक रुपयापासून काही हजार रुपयांपर्यंत व्यवहार ऑनलाइन होत असल्याने बाजारामध्ये रोखीचे व्यवहार कमी होत आहेत. तसेच रोख रक्कम बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

खिसेकापूंची भीती नाही

ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यात सगळेच व्यवहार मोबाईलवरून होऊ लागले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट करणे नागरिकांना सोयीचे वाटते. यासाठी खिशात पैसे ठेवण्याऐवजी आता मोबाईल राहत आहे. यात पैसे हरवण्याची भीती राहिली नाही की खिसेकापूंचीही भीती नाही. पूर्वी रोख रक्कम खिशात असल्याने अनेकदा आपले अर्धे लक्ष खिशाकडे असायचे. गर्दीच्या ठिकाणी तर त्यावर लक्ष ठेवणे कठीण व्हायचे. अशा वेळी अनेकदा पैसे हरवण्याच्या आणि खिसे कापण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता ऑनलाइन व्यवहारामुळे या घटना नियंत्रणात आल्या आहेत.

हिशोबाची नोंद

प्रत्येक ऑनलाईन व्यवहाराची नोंद ?पवर होत असते. हा व्यवहार आपल्याला कधीही पाहता येतो. त्यामुळे पैसा कुठे खर्च झाला आणि कुठे वाचवता आला असता, याविषयी विचार करता येतो. महिना अखेरीस या सर्वांचा हिशोब ठेवून खर्चावर नियंत्रण ठेवता येणे सोपे झाले आहे. यूपीआय, नेटबँकिंगचा वापर केल्याने वेळ वाचतो. शिवाय, व्यवहार तत्काळ होत असतो. विशेष म्हणजे रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसते.

                                                                                                    प्रदीप नारे (खडकेवाडा)

Advertisement
Tags :

.