महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकण रेल्वे मार्गावरील दरड 24 तासांनंतर हटविली

02:38 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ट्रॅक फीट सर्टिफिकेट मिळाले : कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द

Advertisement

प्रतिनिधी / मडगाव

Advertisement

तब्बल 24 तासांनंतर कोकण रेल्वे मार्गावर कोसळेलेली दरड हटविण्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. मात्र, जोरदार पावसामुळे कामात अडथळे येत असल्याने रेल्वे सेवा सुरळीत होण्यास थोडा विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रत्नागिरी विभागातील दिवाणखावटी-विन्हेरे विभागादरम्यान रेल्वे ऊळावर कोसळेली दरड हटवण्यात आली. साडेचार वाजता ट्रॅक फीट सर्टिफिकेट मिळाले होते.

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे ?आतापर्यंत 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 13 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत तर 6 गाड्या अंशत: रद्द केलेल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या गाडी क्रमांक 10103 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. 15 रोजी सुरू होणारा ‘मांडवी एक्सप्रेस’चा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. 50108 मडगाव जं.  सावंतवाडी रोड 15 रोजीची प्रवासी गाडी रद्द केली. रेल्वे क्रमांक 10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसचा प्रवास 15 रोजीचा रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक 10104 मडगाव जं. मुंबई मांडवी एक्स्प्रेसचा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला. गाडी क्र. 11004 सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्सप्रेसचा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला. रेल्वे क्रमांक 12134 मंगळुऊ जं.- मुंबई एक्सप्रेसचा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 12133 मुंबई सीएसएमटी - मंगळुरू जं. 14 रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 20111 मुंबई सीएसएमटी-मडगाव जं. कोकण कन्या एक्सप्रेसचा 14 रोजीचा प्रवास रद्द केला.

गाडी क्रमांक 11003 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. ‘तुतारी एक्सप्रेस’चा 15 रोजीचा प्रवास रद्द केला. गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 12051 मुंबई सीएसएमटी-मडगाव जं. ‘जनशताब्दी एक्सप्रेस’चा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 10105 दिवा-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी रोड मडगाव जं. रद्द करण्यात आली.

वळवण्यात आलेल्या गाड्या गाडी क्र. 22150 पुणे जं.  एर्नाकुलम जं.  एक्सप्रेस 14 रोजीचा प्रवास कल्याण-लोणावळा-दौड मार्गे वळवली आहे.  वाडी-गुंटकल-धर्मावरम जं.-जोलारपेट्टाई-पलक्कड-शोरनूर मार्गे वळवला. गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी)-तिऊवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसचा 14 रोजीचा प्रवास दुसऱ्या मार्गाने वळवला आहे.  गाडी क्र. 09057 उधना मंगळुऊ जंक्शन गाडी कल्याण लोणावळा दौड जंक्शन मार्गे वळवण्यात आली आहे. गाडी क्र. 12432 ह निजामुद्दीन तिऊवनंतपुरम मध्य राजधानी एक्सप्रेसचा प्रवास पनवेल-लोणावळा-दौड जंक्शन मार्गे वळवली आहे.

वाडी-गुंटकल-रेनिगुंटा जोलारपेट्टई-पलक्कड-शोरानूर असा करण्यात आला. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन-एर्नाकुलम जं.चा प्रवास भुसावळ जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे. गाडी क्र. 16335 गांधीधाम नागरकोइल एक्स्प्रेसचा प्रवास कल्याण लोणावळा पुणे जंक्शनमार्गे वाडी गुंटकल धर्मावरम जं.  जोलारपेट्टाई- इरोड जं.  इऊगुर जं.  पोदनूर जं.  पलक्कड जं.  शोरानूर आणि पुढील योग्य मार्गावर वळवण्यात आला. गाडी क्र. 12284 एच. निजामुद्दीन-एर्नाकुलम जं. 13 रोजीचा सुऊ होणारा एक्सप्रेस प्रवास कल्याण-लोणावळा-दौड जंक्शनमार्गे पुन्हा वळवण्यात आला आहे. वाडी गुंटकल-रेनिगुंटा- जोलारपेट्टाई- इरोड जं.  इऊगुर जं.  पोदनूर जं. पलक्कड जं.  शोरानूर व पुढील मार्गे होईल.

अंशत: रद्द गाड्या गाडी क्रमांक 12052 मडगाव जं.  मुंबई ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेसचा प्रवास 14 रोजीचा प्रवास रत्नागिरी येथे थांबला व रत्नागिरी मुंबई दरम्यान अंशत: रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. तेजस एक्स्प्रेसचा 14 रोजीचा प्रवास रत्नागिरी येथे अल्पावधीत संपला. गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. मुंबई ‘कोकण कन्या’ एक्स्प्रेसचा प्रवास 14 रोजी रत्नागिरी येथे थांबला आहे. गाडी क्रमांक 11004 सावंतवाडी रोड दादर ‘तुतारी’ एक्स्प्रेसचा 14 रोजीचा प्रवास रत्नागिरी-दादर दरम्यान अंशत: रद्द करण्यात आला.

गाडी क्र.  12620 मंगळुऊ सेंट्रल-लोकमान्य टिळक (टी) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा 15 रोजीचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. 12201 लोकमान्य टिळक (टी) कोचुवेली एक्सप्रेसचा प्रवास रद्द झाला. गाडी क्रमांक 12133 मुंबई सीएसएमटी-मंगळुऊ जं. 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला. गाडी क्र. 50103 दिवा रत्नागिरी पॅसेंजर प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेसचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. 16346 तिऊवनंतपुरम मध्य लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र.  12134 मंगळुऊ जं. मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास रद्द केला. गाडी क्र.  12202 कोचुवेली लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र.  16345 लोकमान्य टिळक (टी) तिऊवनंतपुरम सेंट्रल ठनेत्रावतीठ एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 12619 लोकमान्य टिळक (टी) चा प्रवास रद्द केलेला आहे.

प्रवाशांसाठी बससेवा

गाड्या रद्द झाल्याने कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे.  याशिवाय मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलेले आहे.

प्रवाशांना मदत मिळत नसल्याची माहिती

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या अचानक रद्द करत प्रवाशांना अडचणीत आणलेले आहे. रात्रीची गाडी वेळेत सोडण्यात आली पण ठाणे येथे नेत रद्द करण्यात आली. रत्नागिरी, राजापूर, आंबावली अशा विविध ठिकाणी असलेल्या प्रवाशांकडून गाड्या किंवा खाद्यपदार्थ उपलब्ध होत नसल्याच्याही तक्रारी येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article