For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील सर्वात महाग टीव्हीची फ्लिपकार्टवर विक्री

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
देशातील सर्वात महाग टीव्हीची फ्लिपकार्टवर विक्री
Advertisement

किंमत तब्बल 30 लाख रुपये असणार

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

फ्लिपकार्टवर भारतातील सर्वात मोठा आणि महागडा टीव्ही 115 इंचाचा टीसीएल एक्स955 मॅक्स टीव्ही ऑनलाइन 30 लाख रुपयांना विकला गेला आहे. हा टीव्ही कंबरेइतका मोठा आहे. एक्स955 मॅक्स हा जगातील सर्वात मोठा क्यू-मिनी एलइडी टीव्ही आहे. तो  4के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन(3840 ते 2160 पिक्सेल) ला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये 12 स्पीकर दिले आहेत.

Advertisement

टीव्हीची वैशिष्ट्यो

  • आकार : टीव्ही क्रीन खूप मोठी आहे. 115 इंचाचा टीव्ही खोलीइतका मोठा आहे.
  • प्रोसेसर : एक्स955 मॅक्स टीव्ही टीसीएल एआयपीक्यू प्रो प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. यात 3 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज आहे.
  • गेमिंग : गेमिंगसाठी 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट, फ्री सिंक प्रीमियम प्रो आणि गेम मास्टर तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
  • कनेक्टिव्हिटी सपोर्ट : तो गुगल टीव्ही, अॅपल एअरप्ले2, होमकिटला सपोर्ट करतो. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये वायफाय 6, ब्लूट्यूथ 5.2, एचडीएमआय 2.1 पोर्ट आहे.
Advertisement
Tags :

.