देशाच्या विदेशी चलन साठ्यात 3.2 अब्ज डॉलर्सची घसरण
पाच महिन्यात नीचांकी आकडा : रिझर्व्ह बँकेची माहिती
वृत्तसंस्था/मुंबई
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 3.235 अब्ज डॉलरची घसरण झालेली आहे. सदरच्या घसरणीसह देशाचा विदेशी चलन साठा 654.857 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे.
पाच महिन्यातला हा नीचांकी विदेशी चलन साठ्याची आकडेवारी असल्याचे सांगितले जात आहे. सदरची घसरण ही 6 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये नोंदली गेली असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी सांगितले आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 1.51 अब्ज डॉलर्सने वाढला होता. हा साठा त्या आठवड्यात 658.091 डॉलर्सवर राहिला होता. सदरची आठवड्यातली वाढ ही जवळपास 8 आठवड्यात सलगच्या घसरणीनंतर विदेशी चलन साठ्यामध्ये पाहायला मिळाली होती. यासोबत सोन्याच्या साठ्यामध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळाली आहे. सदरच्या आठवड्यामध्ये 43 दशलक्ष डॉलर्सने घटून 66.936 अब्ज डॉलर्सवर देशाचा सुवर्ण साठा राहिला होता.