महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशातील पहिली ‘वंदे भारत मेट्रो’ सज्ज

06:20 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चाचणी सुरू : लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

वंदे भारत एक्स्प्रेसच्या यशानंतर आता देशातील पहिली ‘वंदे भारत मेट्रो’ प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय रेल्वेने ‘वंदे भारत मेट्रो’ची चाचणी सुरू केली असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर ही प्रीमियम टेन सर्वसामान्यांना प्रवासासाठी उपलब्ध होईल. ‘वंदे भारत मेट्रो’ ही मेट्रो आणि वंदे भारत एक्स्प्रेस या दोन्हींचे मिश्र्रण आहे. सध्या देशात 52 वंदे भारत एक्सप्रेस यशस्वीपणे चालवल्या जात आहेत.

‘वंदे भारत मेट्रो’चे वैशिष्ट्या म्हणजे ती सध्याच्या वंदे भारत पेक्षा कमी वेळेत अपेक्षित वेग आणि पिकअप पकडू शकते. सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसला शून्यावरून 100 किमीचा वेग गाठण्यासाठी 52 सेकंद लागतात, पण ‘वंदे भारत मेट्रो’ 45 ते 47 सेकंदात शून्यावरून 100 किमीचा वेग गाठू शकते. मात्र त्याचा कमाल वेग सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे. सध्या वंदे भारतचा वेग 180 किमी प्रतितासपर्यंत वाढवला जाऊ शकतो. पण ‘वंदे भारत मेट्रो’चा वेग 130 किमी प्रतितास इतका असेल. कारण वंदे भारत मेट्रोची स्थानके एकमेकांच्या जवळ असल्यामुळे सर्वोच्च वेग मर्यादित ठेवावा लागणार आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article