स्वातंत्र्य दिनासाठी देश सज्ज
पंतप्रधान मोदी सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. जवाहरलाल नेहरूंनंतर सलग 11 वेळा देशाला संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. ‘मोदी 3.0’च्या सुऊवातीला पंतप्रधान मोदी सरकारचे प्राधान्यक्रम देशासमोर मांडू शकतात. तसेच भारताला विकसित देश बनवण्याच्या रोड मॅपबद्दलही भाष्य करू शकतात. स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीसह देशात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी देशातील विशेष निमंत्रितांसोबतच विदेशातील काही निवडक पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आलेले आहे. राजधानी दिल्लीतील मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविल्यानंतर देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांचे भाषण विशेष असेल असे मानले जात आहे. ध्वजारोहण सोहळ्यानंतर विविध सुरक्षा पथकांकडून तिरंग्याला मानवंदना दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करत तिरंग्यासह सेल्फी फोटो हर घर तिरंगा वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले आहे.
आजच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मोदींनी उल्लेख केलेल्या चार वर्गांचे प्रतिनिधी म्हणजेच गरीब, तऊण, शेतकरी आणि महिलांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष निमंत्रितांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात निवडक मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंनाही आमंत्रित करण्यात आले असून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात एकूण 18,000 हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत.
चार श्रेणीतील सुमारे चार हजार पाहुण्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली असून त्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. विशेष निमंत्रितांची 11 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार शेतकरी, युवक, महिला पाहुणे यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण, युवा कार्य, महिला आणि बालविकास मंत्रालयांना देण्यात आली होती. याशिवाय पंचायती राज आणि ग्रामीण विकास, आदिवासी कार्य, शिक्षण आणि संरक्षण मंत्रालयांनीही निमंत्रितांची निवड केली आहे.
राजधानीला छावणीचे स्वरुप
स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमांमुळे दिल्लीत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षेमुळे राजधानीला छावणीचे स्वऊप प्राप्त झाले आहे. देशात अन्यत्रही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील मुख्य सोहळ्यावर एक हजारहून अधिक पॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीत जवळपास दोन हजारहून अधिक मोठ्या आसामी हजेरी लावणार आहेत. याशिवाय आठ ते दहा हजार दिल्लीकरही उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.
काश्मीरमध्ये ‘तिरंगा’ रॅलीचे आयोजन
स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यात एक विशाल ‘तिरंगा’ रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये 10 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. दल सरोवराच्या काठावरील बोटॅनिकल गार्डन येथून रॅलीला सुऊवात झाली. सहभागींनी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरकडे कूच करत बोटॅनिकल गार्डन येथे सांगता करण्यात आली.