स्लीप टूरिजमसाठी आमंत्रित करतोय देश
एक गाव स्वत:चे सौंदर्य अन् निवांतपणाने भरलेल्या जीवनासाठी प्रसिद्ध आहे. या गावाची लोकसंख्या केवळ 65 असून येथील दऱ्याखोरे शांत अन् सुरम्य असून जगभरातून लोक केवळ निवांत झोप घेण्यासाठी आणि स्वत:ला निसर्गाचे सान्निध्य मिळवून देण्यासाठी येथे येत असतात.
या छोट्याशा गावात शहरी जीवनाच्या धकाधकीपासून दूर प्रत्येक गोष्टीत एक अनोखी शांतता अन् ताजेपणा आहे. बर्फाने गोठलेल्या बाल्टिक समुद्राला पार करत एक फेरी पूर्व स्वीडिश बेटसमुहांच्या सुंदर दृश्यांपासून प्रवास करते. स्वीडन आता स्लीप टूरिजमसाठी ग्लोबल डेस्टिनेशन ठरत आहे. जे लोक झोपेचा अभाव अन् तणावाने त्रस्त आहेत, ते येथील शांत नैसर्गिक सौंदर्य आणि थंड भागांमध्ये आल्हाददायक अनुभव घेत आहेत.
स्वीडनची ही संकल्पना आलिशान सुविधांवर आधारित नाही तसेच कुठल्याही विशेष थेरपीवरही आधारित नाही. तर निसर्गाचे सान्निध्य आणि साधेपणा अवलंबिण्यावर केंद्रीत आहे. माझी खोली अत्यंत साधारण होती. एक बेड, खूर्ची, साइड टेबल होता, टीव्ही, तांत्रिक उपकरणे नव्हती, केवळ शांतता अन् निसर्गाचा अद्भूत अनुभव होता असे एका पर्यटकाने सांगितले आहे.
स्वीडनचा विशाल वाइल्डरनेस, थंड रात्री आणि निसर्गासोबत जोडण्याचा प्रकार मानसिक आरोग्याला सुधारतो आणि अनिद्रा कमी करतो असे उप्साला युनिव्हर्सिटीचे स्लीप रिसर्च क्रिश्चियन बेनेडिक्ट यांनी सांगितले. स्वीडनची स्लीप टूरिजमची ही संकल्पना केवळ नैसर्गिक सौंदर्यापुरती मर्यादित नाही. येथील हॉटेल्समध्ये ब्लॅकआउ रुम, मोबाइल-फ्री वेलनेस एरिया आणि स्लीप-प्लेलिस्ट यासारख्या सुविधाही दिल्या जातात.