For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाला मिळाले आणखी एक सुरक्षा कवच

06:21 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशाला मिळाले आणखी एक सुरक्षा कवच
Advertisement

देशाला मिळाले आणखी एक सुरक्षा कवच

Advertisement

वृत्तसंस्था/ गुरुग्राम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी एनएसजीच्या मानेसर प्रशिक्षण केंद्रात नॅशनल आयईडी डाटा मॅनेजमेंट सिस्टीमचा (एनआयडीएमएस) व्हर्च्युअल शुभारंभ केला आहे. या अत्याधुनिक सिस्टीमच्या माध्यमातून दहशतवादी घटना आणि आयईडी स्फोटांशी निगडित डाटाचे वैज्ञानिक विश्लेषण पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि अचूक पद्धतीने शक्य होणार आहे.

Advertisement

ही प्रणाली देशाच्या सुरक्षेसाठी डाटा कवचप्रमाणे काम करणार असून तपास यंत्रणांना एक मजबूत तांत्रिक व्यासपीठ प्रदान करणार असल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत.

डाटाचे होणार केंद्रीकरण

एनआयडीएमएसच्या माध्यमातून देशभरात विखुरलेल्या विविध प्रकारच्या डाटाला केंद्रीक्त एकाच प्लॅटफॉर्मवर आणले जाणार आहे. यामुळे दहशतवादी घटनांच्या परस्पर संबंधांचा शोध लावणे सोपे ठरेल आणि तपासाच्या गुणवत्तेसोबत वेगही वाढणार आहे.  ही प्रणाली ‘वन नेशन, वन डाटा टेरिटरी’च्या दिशेने मोठे पाऊल असून आता योग्य माहिती योग्यवेळी यंत्रणांना उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळे कुठल्याही घटनेवर त्वरित आणि प्रभावी प्रतिक्रिया मिळू शकणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत:च्या संबोधनात एनएसजीच्या भूमिकेचे कौतुक करत हे देशाचे ‘झिरो टेरर फोर्स’ आहे आणि प्रत्येक आव्हान पेलून देशाच्या नागरिकांना सुरक्षा प्रदान करत असल्याचे उद्गार काढले आहेत.

सर्व धोक्यांना सामोरे जाण्यास सक्षम

एनएसजीची सदैव सक्रीयता आणि उच्चस्तरीय प्रशिक्षणामुळे भारत सर्वप्रकारच्या दहशतवादी धोक्यांना सामोरे जाण्यास सक्षम आहे. बॉम्ब डिस्पोजल आणि दहशतवादविरोधी अभियानांमध्ये एनएसजीने जगात स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. एनएसजीच्या नेटवर्कचा वेगाने विस्तार केला जात आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांमध्ये एनएसजीची नवी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि अयोध्येतही केंद्र सुरू केले जात आहे. या केंद्रामुळे एनएसजी आता देशातील कुठल्याही हिस्स्यात केवळ एक ते दीड तासात पोहोचू शकते. यामुळे प्रतिक्रिया कालावधीत मोठी घट झाली असून सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत झाली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2014 पासून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सातत्याने सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित दल आणि डाटा आधारित तपास प्रणालीने सुरक्षा व्यवस्थेला नवी शक्ती दिली आहे. एनआयडीएमएसची सुरुवात या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून यामुळे वैज्ञानिक पुरावे आधारित तपास आणि आंतर-यंत्रणा समन्वयाला नवी गती मिळणार आहे. ही प्रणाली आगामी काळात देशाला दहशतवादाच्या धोक्यापासून आणखी अधिक सुरक्षित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

एनआयडीएमएस : दहशतवाद विरोधात भारताचा नवा ‘डाटा कवच’

नॅशनल आयईडी डाटा मॅनेजमेंट सिस्टीम

दहशतवादी घटनांशी निगडित डाटाची आधुनिक प्रणाली

वैज्ञानिक पुरावे आधारित तपास

आयईडी स्फोटांचे जलद अन् अचूक विश्लेषण शक्य होणार, यामुळे तपासाला वेग मिळणार.

वन नेशन, वन डाटा टेरिटरी

देशभरात विखुरलेल्या डाटाला एकाच प्लॅटफॉर्मवर केंद्रीत केले जाणार

राष्ट्रीय सुरक्षेवर प्रभाव

तपासाला वेग अन् गुणवत्ता

विविध दहशतवादी घटनांदरम्यान परस्पर लिंकचा शोध लावणे सोपे ठरणार

एनएसजीचे विस्तारलेले नेटवर्क

मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि अयोध्या सारख्या शहरांमध्ये नवी केंद्रे स्थापन.

प्रतिक्रिया वेळेत मोठी घट

एनएसजी आता 1 ते 1.5 तासात देशाच्या कुठल्याही हिस्स्यात पोहोचू शकते

Advertisement
Tags :

.