यंदा देशात तेरावा सर्वात कोरडा मान्सून
पंजाबमध्ये 41 टक्के कमी पाऊस, तर महाराष्ट्रात उणे 19 टक्के
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यंदाचा मान्सून हंगाम देशभरात 13 वा सर्वात कमी पावसाचा म्हणजेच कोरडा हंगाम ठरला. गेल्या 11 वर्षांतील हा सर्वात कमी पावसाचा हंगाम होता. 2015 नंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि, हंगामाच्या समाप्तीपूर्वी देशाच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकंदर पावसाची तूट 2.5 टक्क्यांनी सुधारली. पंजाबमध्ये सर्वाधिक 41 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. हीच तूट कर्नाटकात 30.3 टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राजस्थानमध्ये 22 टक्के तुटीची नोंद झाली. इतर नऊ राज्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. 2026 चा मान्सून हंगाम सरासरीपेक्षा 12.6 टक्के कमी पावसासह संपला. देशातील 43 टक्के जिह्यांमध्ये 20 टक्के ते 72 टक्के कमी पाऊस झाला. पूर्व भारतात ओडिशामध्ये सरासरीपेक्षा 30 टक्के जास्त पाऊस झाला, तर पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांमध्ये 1901 नंतरची सर्वात कमी पावसाची नोंद झाली.