For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कच्च्या तेलाच्या आयातीवरचा खर्च वाढला

06:20 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कच्च्या तेलाच्या आयातीवरचा खर्च वाढला
Advertisement

मे महिन्यातील तेल आयात : 81 टक्के खर्चात वाढ

Advertisement

वृत्तसंस्था नवी दिल्ली

पश्चिम आशियातील संकटाचा सामना भारताला सध्याला करावा लागतो आहे. मे मधील तेलाच्या आयातीसाठी जवळपास 81.5 टक्के इतका जास्त खर्च भारताला करावा लागला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. भारताने मे महिन्यामध्ये 18.7 अब्ज डॉलर्सच्या तेलाची आयात केली होती.

Advertisement

पश्चिम आशियातील संकटामुळे उर्जेसाठीचा खर्च वाढला आहे. या अनुषंगाने कच्च्या तेलाच्या आयातीवरचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आकडेवारीनुसार यावर्षी मे महिन्यात मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत समान मात्रेमध्ये कच्चे तेल आयात केले गेले होते. परंतु या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी मात्र 81 टक्के इतकी रक्कम ज्यादा खर्च करावी लागली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल यांच्यानुसार ही माहिती समोर आली आहे. यावर्षी मे महिन्यात 2.16 कोटी टन इतके कच्चे तेल आयात केले गेले. यासाठी जवळपास 18.7 अब्ज डॉलर्स रुपये इतकी रक्कम खर्च करावी लागली आहे. मागच्या वर्षी देशात मे महिन्यात 2.13 कोटी टन इतके कच्चे तेल विदेशातून आयात केले गेले होते. यासाठी त्यावर्षी केवळ 10 अब्ज डॉलर्स खर्च करावा लागला होता.

भारतीय बास्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत वाढून 106.23 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली होती. याच तुलनेत मागच्या वर्षी मे मध्ये 64.04 प्रति बॅरल इतकी कच्च्या तेलाची किंमत होती. भारतामध्ये आयात होणाऱ्या सर्वाधिक साहित्यामध्ये कच्च्या तेलाची हिस्सेदारी ही सर्वात मोठी आहे. एकंदर सर्व मालाची आयात होणाऱ्या खर्चामध्ये पाहता कच्च्या तेलाची हिस्सेदारी 20 टक्के इतकी आहे.

इंधनाच्या उपलब्धततेसाठी..

संकटाच्या दरम्यान भारताने इंधनाची पुरेपूर उपलब्धता राहावी या अनुषंगाने भारताने कच्चे तेल किंमत वाढूनसुद्धा खरेदी करणे सुरूच ठेवले होते. होर्मुझ बंदरामधून जहाजांची आवक संथ राहिल्याने पश्चिम आशियामध्ये कच्च्या तेलाची कमी प्रमाणात आयात होत होती. यामुळे मागच्या काही महिन्यांमध्ये उर्जेचा खर्चही वाढला होता. याच तुलनेमध्ये पाहता तेल आणि गॅसवरचा देशातला शुद्ध खर्च हा मे मध्ये वर्षापूर्वी मे च्या तुलनेमध्ये 75 टक्के वाढ होऊन 17.5 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

Advertisement
Tags :

.