For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीत आम्हाला सावत्र नाही, तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित !

03:59 PM Apr 23, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महायुतीत आम्हाला सावत्र नाही  तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित
Advertisement

शिवसेना पदाधिकऱ्यातून सूर ; कुडाळ येथे महायुतीची समन्वय बैठक संपन्न

Advertisement

कुडाळ

शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सारे काही आलबेल आहे, असे शिंदे गटाचे कुडाळ मालवण ' विधानसभा मतदार संघ प्रमुख बबन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गट कुडाळ- मालवण तालुका आणि भाजप पदाधिकारी यांची समन्वय बैठक आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे झाली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी तक्रारींचा पाढाच वाचला. महायुती मध्ये आम्हाला सावत्र भावाची नाही तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित आहे असा सूर शिवसेना पदाधिकऱ्यातून बाहेर आला. या बैठकीला भाजपच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तसंच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे ,जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर, मालवण- कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर उपस्थित होते. बैठकीनंतर शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय झाल्याचं सांगण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या संख्येने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचा अबकी बार 400 पार चा नारा यशस्वी करून त्यांना पंतप्रधान करू असा विश्वास यावेळी बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला .

Advertisement

Advertisement
Tags :

.