For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीतील जलतरण तलावाभोवतालचा वाद

06:42 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीतील जलतरण तलावाभोवतालचा वाद
Advertisement

कायद्यांच्या आधारे आता वर्णाधारित भेदभाव जगाच्या पाठीवरून बऱ्यापैकी नामशेष झाला असला तरी पुरता नामोहरम मात्र झालेला नाही. याचीच प्रचिती देणारी जर्मनीतील एक घटना, बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली. जर्मनीची राजधानी बर्लिनमधील फोल्क्सब्युने नाट्यागृहासमोरच्या एका जलतरण तलावात 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमाची जाहिरात ‘केवळ कृष्णवर्णीय लोकांसाठी’ अशी केली गेली. त्यामुळे जे वादंग उठले त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.

Advertisement

कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांची गुलामगिरी आणि त्यासोबत येणारी वर्ण व वंशद्वेषाची भावना आणि भेदभाव हे ‘अनिष्ट’ अति प्राचीन काळापासून चालत आले होते. ते मानवी जगातून हद्दपार करण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे समान अधिकार व हक्कांचे नागरी कायदे संमत होऊन कृष्णवर्णीय जमातींना दिलासा मिळाला. कायद्यांच्या आधारे आता वर्णाधारित भेदभाव जगाच्या पाठीवरून बऱ्यापैकी नामशेष झाला असला तरी पुरता नामोहरम मात्र झालेला नाही. याचीच प्रचिती देणारी जर्मनीतील एक घटना, बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली. जर्मनीची राजधानी बर्लिनमधील फोल्क्सब्युने नाट्यागृहासमोरच्या एका जलतरण तलावात 14

ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमाची जाहिरात ‘केवळ कृष्णवर्णीय लोकांसाठी’ अशी केली गेली. त्यामुळे जे वादंग उठले त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या दिवशी, या तलाव परिसरात, भेदभावाविरोधात कार्यरत आणि जर्मनीमधील कृष्णवर्णीय लोकांसाठी काम करणाऱ्या, ‘ईच वन टीच वन’ संस्थेद्वारे, बर्लिनमधील कृष्णवर्णीय मुले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सहल आयोजित करण्यात आली होती. यामुळे नाट्यागृहाने उभारलेल्या खुल्या जलतरण तलावात, पोहण्याचा आनंद लुटत एक खास दुपार घालवण्याची संधी संबंधितांना मिळणार होती. फोल्क्सब्युने नाट्यागृहाच्या कार्यक्षेत्रात तलाव समाविष्ट असल्याने, त्याचेही सक्रिय सहकार्य उपक्रमास लाभले होते. या निमित्ताने पोहणाऱ्यांना सांगण्यात आले की, शुक्रवार दि. 14 रोजी जलतरण तलाव, दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत केवळ कृष्णवर्णीय समुदायांसाठी चालवला जाणार आहे आणि जनतेने या सामूहिक स्व निर्धारणाचा आदर करावा. या कार्यक्रमाचा प्रचार नाट्यागृहाद्वारे संरचनात्मकदृष्ट्या ‘वंचित’ गटांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सकारात्मक उपाय म्हणून करण्यात आला होता, ज्याचा उद्देश कृष्णवर्णीय लोक आणि पोहणे याबद्दलच्या दीर्घकाळ चालत आलेल्या रुढीवादी कल्पनांना आव्हान देणे, तसेच सहभागाला निरुत्साहित करू शकणाऱ्या प्रवेशयोग्यता, खर्च आणि प्रतिनिधीत्वाचा अभाव यासारख्या अडथळ्यांना दूर करणे हा होता.

Advertisement

कार्यक्रमास विरोध

कृष्णवर्णीय मुलांनी, सार्वजनिक जलतरण तलावावर दुपारचा आनंद घेण्याची ही कल्पना, अनपेक्षितरित्या वादग्रस्त ठरली. उजव्या विचारसरणीच्या काही महाभागांनी, ही श्वेतवर्णीय विरोधी, भेदभावाची आणि चिथावणीची लाट असल्याचे म्हणत, आयोजकांवर शिव्या-शापांचा भडीमार केला. बर्लिन हे राहण्यायोग्य, वैविध्यपूर्ण, रंगीबेरंगी आणि मुक्त शहर आहे. मग आपल्याला सुरक्षित जागांची गरज का आहे? असा प्रश्न स्थानिक ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या आयलीन वायबेलर यांनी उपस्थित केला. जर्मन राजकारणातील महत्त्वाचा पक्ष ‘अल्टरनेटिव्ह फर

डॉ इचलँड’ (जर्मनीसाठीचा पर्याय) च्या सहनेत्या

अॅलिस वायडेल यांनी या निर्णयाचे वर्णन ‘एक वर्णभेद’ असे केले, ‘ज्यामध्ये गोऱ्या लोकांना तात्पुरता प्रवेश नाकारला जातो.’ आणि त्यानंतर अशा कार्यक्रमांसाठी मिळणारा निधी तात्काळ बंद करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या अति उजव्या पक्षाने एक्स हँडलवर एक एआय निर्मित प्रतिमा टाकली, ज्यावर लिहिले होते. ‘बर्लिनमध्ये करदात्यांच्या पेशाने वांशिक विलगीकरण-तुम्ही गोरे आहात का? मग प्रवेश नाही.’ ब्रँडनबर्ग राज्य संसदेचे सदस्य डेनिस होहलोख यांनी तर, कार्यक्रमाआधी एक्सवर लिहिले, ‘माझी सूचना आहे, उद्या दुपारी 12 वाजल्यापासून जलतरण तलावापर्यंत सर्वांनी पांढरे कपडे घालावेत,’ या टिकास्त्रामुळे बर्लिनमध्ये जणू असा आभास निर्माण झाला की, बिचाऱ्या सहनशील गोऱ्यांना, कृष्णवर्णीयांकडून बहिष्कार आणि भेदभावाची वागणूक मिळत आहे. वरवर पाहाणाऱ्यांना हा स्थितीजन्य ‘कायापालट’ विस्मयचकित करणारा ठरला. या गदारोळानंतर सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला. धमक्या आणि वर्णद्वेषी इमेल्सना सामोरे जाणाऱ्या आयोजकांनी, तो रद्द करताना, ‘आता नोंदणी केलेल्या उपस्थितांच्या सुरक्षित आगमनाची आणि प्रस्थानाची आपण हमी देऊ शकत नाही’, असे स्पष्टीकरण दिले. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर नाट्यागृहाबाहेर आयोजित केलेल्या वंश वर्णवाद विरोधी निदर्शनांमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते.

कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आयोजनात सहकार्य करणारे, फोल्क्सब्युने नाट्यागृहाचे प्रमुख व सर्जनशील दिग्दर्शक मॅथियास लिलिऍन्थाल म्हणाले, कार्यक्रम रद्द झाला असला तरी, नाट्यागृह निश्चितच, संरचनात्मक दृष्ट्या वंचित लोकांसाठी सकारात्मक उपक्रम राबवत राहील. जर्मनीतील ‘डाय लिंके’ या डाव्या पक्षांच्या नेत्या आणि आगामी बर्लिन महापौरपद निवडणुकीत प्रमुख उमेदवार, एलिफ  एरल्प यांनी, ‘जलतरण तलाव कायदेशीररित्या आरक्षित केला आहे. नाट्यागृह अशा लोकांना तेथे प्रवेश उपलब्ध करून देते, ज्यांना अनेकदा बहिष्कार आणि वर्णभेदाचा सामना करावा लागतो. याला भेदभावाचा प्रकार म्हणणे बरेच काही सांगून जाते.’ अशी सुचक प्रतिक्रिया दिली. बर्लिनच्या भेदभाव विरोधी सिनेटर कॅन्सेल किझिल्टेपे यांनी कार्यक्रम रद्द होणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हणत, अल्टरनेटिव्ह फर डॉइचलँडच्या तथाकथित ‘वर्णभेद’ आरोपांना उत्तर देताना, भेदभावाविरुद्ध असण्याचा अर्थ विषमतेकडे दुर्लक्ष करणे नव्हे. वर्णभेद आणि बहिष्कार हे कृष्णवर्णीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत आणि त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी काहीतरी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.

जलतरण तलावाभोवतालचे वाद

जर्मनीतील घटना ही जलतरण तलावांना, वर्णवाद किंवा वंशवादाशी जोडणाऱ्या घटनांतील सर्वात ताजी घटना होती. अमेरिका आणि युरोपमध्ये जलतरण तलाव अनेकदा व्यापक वांशिक तणाव आणि बहिष्काराचे केंद्रबिंदू ठरले आहेत. या उन्हाळ्याच्या आरंभी पूर्व जर्मनीतील, हाले शहरातील, एका खुल्या जलतरण तलावाने जर्मनी भाषा न बोलणाऱ्या पोहणाऱ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे तो चर्चेत आला होता. नेदरलँडसमधील जलतरण तलावाने अलीकडेच एका कृष्णवर्णीय मुलाला ओळख तपासणीसाठी लक्ष्य केल्याने मानवाधिकार संस्थेने व्यवस्थापनाच्या विरोधात निकाल दिला. 2022 मध्ये रोमानियातील एक जलतरण तलावाला मुलांना प्रवेश नाकारल्याबद्दल दोन हजार युरोहून अधिक दंड ठोठावण्यात आला. 2013 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये ब्रेमगार्टन शहराने आश्रय घेऊ पाहणाऱ्या लोकांच्या  तलाव प्रवेशावर निर्बंध घातले. अमेरिकेत तर 1964 साली गोऱ्यांसाठी असलेल्या जलतरण तलावात, कृष्णवर्णीय पोहत असलेले पाहून हैड्रोक्लोरिक अॅसिड ओतल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.