बांधकाम कामगारांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करावे
इचलकरंजी :
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिका अधिक बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावे.त्यासाठी शिव कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या सर्व लाभार्थी पर्यंत पोहचावे असे प्रतिपादन भाजपाचे उपाअध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले. शिव कामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपा कार्यालयात पार पडला.त्यावेळी सुरेश हाळवणकर बोलत होते.
सुरेश हाळवणकर म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला योजना,आयुष्मान भारत योजना,रूप टॉप सौर ऊर्जा अशा अनेक जनकल्याणाच्या योजना राबविल्या आहेत.रूप टॉप योजनेत एक कोटी लोकांनी नोंदणी केली आहे.त्यात महिलांनी सहभागी व्हावे.महाराष्ट्र शासनही अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या आहेत.सुरेश खाडे हे कामगार मंत्री आहेत.त्यांना सांगून शिव कामगार सेनेच्या एका पदाधिक्रायाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर घेण्यास सांगितले जाईल. बांधकाम कामगारांनी तीस हजार चे मताधिक्य दिले तर माने एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन धैर्यशील माने यांना मतदान करणे विषयी आवाहन करावे.
जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर म्हणाले, बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घर ते घर पोहचावे आणि धैर्यशील माने यांनी केलेली कामे पटवून द्यावित. श्वेता मालवणकर यांचेही भाषण झाले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिव कामगार सेनेच्या पदाधिक्रायांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पै अमृत भोसले वस्त्राsद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयश बुगड, गुंडू वड्ड,बंडोपंत सातपुते, बी जी चांदुरकर,सीमा पोवार, रसिका साळुंखे, मनीषा नाईक, संगीता सिंग कविता तोरगले आदी उपस्थित होते.
सुभाष लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले निलेश दीक्षांत यांनी आभार मानले.