For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेला बोगद्याची निर्मिती पूर्ण, नव्या वर्षात होणार लोकार्पण

06:35 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
सेला बोगद्याची निर्मिती पूर्ण  नव्या वर्षात होणार लोकार्पण
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नव्या वर्षात देशवासीय पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. बहुप्रतीक्षित आणि जगातील सर्वात उंचीवर तयार होणाऱ्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुहेरी मार्गिका असलेला हा ऑलवेदर बोगदा अरुणाच्या प्रदेशच्या पश्चिम कामिंग आणि तवांग जिल्ह्यांना जोडणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी हा एकमात्र मार्ग आहे. उणे 20 अंश तापमानातही याचे काम दिवसरात्र सुरु आहे. बीआरओच्या देखरेखीत तयार होणारा हा बोगदा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे निर्माण करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मापदंडांची पूर्तता करणारा हा बोगदा आहे.

या बोगद्याच्या निर्मितीमुळे अरुणाचल प्रदेशच्या लोकांना मोठी मदत होणार आहे. तर तवांग सेक्टरमध्ये भारतीय सैन्याचे बळ वाढणार आहे. सैन्य अधिक जलदपणे सीमेपर्यंत पोहोचू शकणार आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात हा बोगदा पंतप्रधानांच्या हस्ते देशवासीयांना समर्पित केला जाऊ शकतो.

Advertisement

सेला खिंडीत सध्या भारतीय सैन्य आणि क्षेत्रातील लोक तवांग येथे पोहोचण्यासाठी बालीपारा-चारीदुआर रस्त्याचा वापर करत आहेत. हिवाळ्यात अतिहिमवृष्टीमुळे सेला खिंडीचा मार्ग बंद होतो.  अशास्थितीत प्रवासासाठी अनेक तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. यादरम्यान तवांग सेक्टरशी रस्तेसंपर्क देशाच्या उर्वरित हिस्स्यांशी प्रस्थापित होत नाही. सेला खिंड बोगदा सध्याच्या रस्त्याला बायपास करत बैसाखीला नूरानंगशी जोडणार आहे.

बोगदा प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर आहे. यात बोगदा आणि रस्त्यांचा समावेश आहे. पश्चिम कमिंग जिल्ह्याच्या (बैसाखी) दिशेकडून 7.2 किलोमीटरचा प्रवास केल्यावर बोगदा-1 मध्ये प्रवेश होतो. याची लांबी सुमारे 1 किलोमीटर आहे. यानंतर येणाऱ्या रस्त्याची लांबी 1.2 किलोमीटर आहे. यानंतर बोगदा-2 समोर येतो, ज्याची लांबी 1.591 किलोमीटर इतकी आहे. बोगद्यातून बाहेर पडल्यावर नूरानंग दिशेने जाणारा रस्ता आहे.

Advertisement
Tags :

.