महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तोयबा’चा काश्मीरमध्ये दहशत माजवण्याचा कट

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इतर चार संघटनाही हल्ल्याच्या तयारीत : गुप्तचर इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात दहशत माजवण्याची योजना आखत आहेत. या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात घुसून मोठा हल्ला करायचा आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानसमर्थित इतर चार संघटनाही प्रजासत्ताक दिनी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना 26 जानेवारीला खोऱ्यात दहशतवादी कटाची माहिती मिळाली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे ही माहिती केंद्रीय गृह मंत्रालयालाही देण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी जम्मू भागात संभाव्य धोक्मयाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे. प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमांना लक्ष्य करून खोऱ्यातील वातावरण बिघडवण्यासाठी दहशत पसरवण्याचा कट दहशतवादी संघटनेने आखला आहे.

तोयबाचे तीन ते चार दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात. हे सर्व दहशतवादी वातावरण बिघडवण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सच्या मदतीने घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पाकिस्तानकडून सातत्याने कट रचले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर 26 जानेवारीपूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या दहशतवादी संघटना सक्रिय केल्या आहेत. पाकिस्तानने खोऱ्यातील वातावरण बिघडवण्यासाठी तोयबा आणि इतर दोन दहशतवादी संघटनांना तयार केले आहे. या दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी घुसखोरीचा प्रयत्नही केला होता. मात्र अपयश आल्याने दहशतवाद्यांना पाकिस्तानी रेंजर्सच्या आश्र्रयाला परत जावे लागले. पाकिस्तानने 26 जानेवारीला पुन्हा एकदा चार दहशतवाद्यांना घुसवण्याचा मोठा कट रचला आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांना यासंबंधी कानोसा लागल्यानंतर कोणत्याही प्रकारची दहशत आणि घुसखोरी टाळण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीही खोऱ्यात आयोजित कार्यक्रमांसाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे.

मनसुबे उधळून लावण्यासाठी मोर्चेबांधणी

जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट, ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स, यूथ फोरम फॉर काश्मीर या संघटनांसह जम्मू-काश्मीर लिबरेशन सेलशी संबंधित लोकांना पाकिस्तानने खोऱ्यातील वातावरण बिघडवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सक्रियतेमुळे खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवादी आणि पाठबळ वाढू दिले नाही. या संघटनांशी संबंधित लोक घाटीत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावून वातावरण बिघडवण्याच्या तयारीत होते. याशिवाय पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दहशतवादी संघटनांनीही प्रजासत्ताक दिनी वातावरण बिघडवण्यासाठी सोशल मीडियावर योजना आखली होती. मात्र, पाकिस्तान आणि त्याच्या समर्थक दहशतवादी संघटनांचे मनसुबे उधळून लावून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article