For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीतीदायक स्वप्नांचे वृद्धत्वाशी कनेक्शन

06:12 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
भीतीदायक स्वप्नांचे वृद्धत्वाशी कनेक्शन
Advertisement

तुम्हाला रात्री भीतीदायक स्वप्नं (नाइटमेयर्स) पडतात का? एका संशोधनानुसार आठवड्यात एकदा किंवा अधिक नाइटमेयर्स येणाऱ्या प्रौढांमध्ये अकाली मृत्यू होण्याचा (70 वर्षांपूर्वी) धोका तीनपट अधिक असतो. हे अध्ययन युरोपियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी काँग्रेस 2025 मध्ये सादर करण्यात आले आहे. अशाप्रकारची स्वप्नं तणाव आणि झोपेत गडबड निर्माण करत शरीराच्या पेशींना लवकर वृद्ध करतात. हा धूम्रपान, स्थुलत्व, खराब आहार आणि कमी व्यायामापेक्षाही अधिक मोठा धोका असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement

हे संशोधन यूके डिमेंशिया रिसर्च इन्स्टीट्यूटचे डॉ. अबिदेमी ओतैकू यांनी केले आहे. यात 4196 प्रौढांना (26-74 वयोगट) सामील करण्यात आले. जे चार वेगवेगळ्या पॉप्युलेशन-बेस्ड कोहार्ट स्टडीजमधील होते. त्यांचा फॉलोअप 18 वर्षांपर्यंत चालला आहे. यात लोकांनी स्वत:ला कितीवेळा नाइटमेयर्स येतात हे सांगितले आहे.

मुख्य शोध

Advertisement

आठवड्यात एक किंवा अधिक नाइटमेयर्स येणाऱ्या लोकांमध्ये 70 वर्षांपूर्वी मृत्यूचा धोका तीनपट (हॅजार्ड रेशियो 2.73) अधिक होता. ज्यांना कधी-कधी किंवा कधीच नाइटमेयर्स पडत नसलेल्या लोकांच्या तुलनेत हे प्रमाण आहे. फॉलोअपमध्ये 227 लोकांचा अकाली मृत्यू झाला.

बायोलॉजिकल एजिंग

अशाप्रकारचे लोक वेगाने वृद्ध होत असतात. हे टेलोमियर लांबी (पेशींच्या वयाचे माप) आणि एपिजेनेटिक क्लॉक्स (डीएनए मेथिलेशनद्वारे मापले जाणारे बायोलॉजिकल वय)द्वारे मोजण्यात आले. तीन क्लॉक्स वापरण्यात आले यात डुनेडिन पीएसीई, ग्रिमएज आणि फेनोएज सामील आहे. जलद एजिंग मृत्यूच्या धोक्याचा 39-40 टक्के हिस्सा समजतो.

मुलांमध्येही : मुलांमध्ये सातत्याने नाइटमेयर्स जलद एजिंगचे संकेत दाखवितात.

अन्य जोखिमींशी तुलना : नाइटमेयर्स हे स्मोकिंग, ओबेसिटी, खराब आहार किंवा कमी शारीरिक हालचालींपेक्षा अधिक मजबूत प्रेडिक्टर आहे. दुस्वप्नांना जलद एजिंग आणि मृत्यूशी जोडणारे हे पहिले अध्ययन आहे.

नाइटमेयर्स कशाप्रकारे नुकसान पोहोचवितात

नाइटमेयर्स केवळ भीतीदायक स्वप्नंच नाही  तर आरोग्यासाठी गंभीर धोका आहे....

तणावाची प्रतिक्रिया : नाइटमेयर्सद्वारे फाइट-ऑर-फ्लाइट रिस्पॉन्स सक्रीय होते. जे हार्टरेट वाढविते, तणावयुक्त हार्मोन सोडते, वारंवार असे घडल्याने शरीरावर सातत्याने दबाव पडतो.

झोपेतील गडबड : नाइटमेयर्समुळे झोपमोड होते, ज्यात रेम स्लीप प्रभावित होते. खराब झोपेमुळे पेशी वेगाने हानीग्रस्त होतात.

सेल्युलर एजिंग : यामुळे टेलोमियर छोटे होतात (पेशींच्या टोपी ज्या वय वाढण्यापासून वाचवितात)  आणि एपिजेनेटिक बदल होतात, जे डीएनएला प्रभावित करतात, यामुळे शरीराचे वय कॅलेंडर वयापेक्षा अधिक होते.

मृत्यूचा धोका : जलद एजिंगमुळे हृदयविकार, कॅन्सर किंवा अन्य रोग लवकर होतात. अध्ययनात काँक्स रिग्रेशनद्वारे हे सिद्ध झाले आहे. एका अन्य संशोधनात नाइटमेयर्स सुसाइड रिस्कशी जोडलेले आढळून आले आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल सायकियाट्रीमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार मानसिक रुग्णांमध्ये वाईट स्वप्ने सुसाइडल क्रायसिसच्या 4 महिन्यांपूर्वी सुरू होतात.

प्रतिबंध अन् उपचार

नाइटमेयर्स एक रोखण्यायोग्य आरोग्य समस्या असल्याचे वैज्ञानिक सांगतात.

स्क्रीनिंग : झोपेची समस्या, तणाव आणि मानसिक आरोग्य तपासावे.

उपचार : कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी फॉर इंसोम्निया (सीबीटी-आय) किंवा इमेज रिहर्सल थेरपी (आयआरटी)-जेथे भीतीदायक स्वप्नांना चांगल्यात बदलण्याचा अभ्यास करावा.

लाइफस्टाइल : नियमित व्यायाम, चांगल्या झोपेच्या सवयी आणि तणाव कमी करणाऱ्या हालचाली (उदाहरणार्थ मेडिटेशन).

जर नाइटमेयर्सचा उपचार असेल तर एजिंग मंद होऊ शकते आणि वय वाढू शकते का हे पुढील संशोधनातून कळणार आहे.

Advertisement
Tags :

.