5 राज्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून समित्या स्थापन
प्रियांका वड्रांकडे आसामची जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांना आगामी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणाऱ्या 5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवड समित्यांची घोषणा केली आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पु•gचेरीसाठी 4 सदस्यीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे मुख्य कार्य निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या यादीला अंतिम रुप देणे आहे. खासदार आणि महासचिव प्रियांका वड्रा आसाम समितीचे नेतृत्व करतील. आसाममध्ये काँग्रेस अन्य विरोधी पक्षांसोबत आघाडी करत भाजपला सत्तेवरून हटविण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांका वड्रा यांच्यासोबत लोकसभा खासदार इम्रान मसूद, सप्तगिरी शंकर उलाका आणि सिरिवेल्ला प्रसाद यांना आसाम समितीचे सदस्य करण्यात आले आहे.
कोणत्या राज्याची कुणाकडे जबाबदारी
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मधुसूदन मिस्त्राr हे केरळसाठी निवड समितीचे प्रमुख असतील. तर छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंह देव हे तामिळनाडू अणि पु•gचेरीसाठी समितीचे अध्यक्षत्व करतील. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना निवड समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. संबंधित राज्यांचे प्रभारी महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ गटाचे नेतेही स्वत:च्या राज्यांच्या समित्यांचे सदस्य असणार आहेत.
आसाममधील राजकीय समीकरण
आसामच्या 126 सदस्यीय विधानसभेसाठी मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात काँग्रेसने डावे पक्ष आणि अनेक प्रादेशिक पक्षांसोबत मिळून निवडणूक लढण्यासाठी एक संयुक्त व्यासपीठ तयार केले होते. सद्यकाळात आसाम विधानसभेत सत्तारुढ भाजपकडे 64 जागा आहेत तर मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे 26 आमदार आहेत. उर्वरित जागा या स्थानिक पक्षांकडे आहेत.