महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस मुख्यालयाचे लवकरच होणार नव्या वास्तूत स्थलांतर

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस पक्ष लवकरच स्वत:चे कार्यालय बदलणार आहे. पक्ष जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात स्वत:चे मुख्यालय इतरत्र हलविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवे मुख्यालय इंदिरा भवन या नावाने ओळखले जाणार आहे. सध्या काँग्रेसचे कार्यालय दिल्लीत 24 अकबर मार्गावर आहे. हे लुटियन्स दिल्लीत टाइप 7 बंगल्यात आहे. 1978 मध्ये इंदिरा गांधी यांनी या मुख्यालयाचे उद्घाटन केले होते. 44 वर्षांपासून हेच मुख्यालय काँग्रेसच्या उतार-चढावपूर्ण वाटचालीचे साक्षीदार राहिले आहे. काँग्रेसचे नवे कार्यालय दीनदयाळ उपाध्याय मार्गावर तयार केले जात आहे. हे कार्यालय भाजपच्या कार्यालयानजीकच आहे. काँग्रेसचे नवे कार्यालय अहमद पटेल आणि मोतिलाल व्होरा यांच्या देखरेखीत तयार करण्यात आले होते.

Advertisement

नव्या कार्यालयाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांचे निधन झाले आहे. नव्या कार्यालयाचा पत्ता 9 कोटला मार्ग असणार आहे. याचे नाव माजी इंदिरा भवन ठेवण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात काँग्रेसला नवे कार्यालय प्राप्त होणार आहे. काँग्रेसचे नवे कार्यालय 6मजली असून याची निर्मिती सर्व आधुनिक सुविधांचा विचार करत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च महिन्यात नव्या कार्यालयाबाहेर अवैध बांधकाम हटविले होते. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या साइड इंट्रीवर अतिरिक्त पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या, याकरता पालिकेकडून अनुमती घेण्यात आली नव्हती. यापूर्वी भाजपने 2018 मध्ये मुख्यालय नव्या इमारतीत हलविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या तीनमजली नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. हे कार्यालय 1.70 लाख चौरस फुटांमध्ये फैलावलेले आहे. याचबरोबर दिल्लीतील लुटियन्स झोनबाहेर स्वत:चे कार्यालय नेणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article