For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांकवाळ येथे भूमिगत गॅसवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांची स्थिती दयनीय

12:27 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांकवाळ येथे भूमिगत गॅसवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांची स्थिती दयनीय
Advertisement

वार्ताहर /झुआरीनगर

Advertisement

उपासनगरातील गृहनिर्माण वसाहतीत भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदलेले रस्ते डांबरीकरण न केल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. पूर्वी येथील रस्ते चांगल्या स्थितीत होते परंतु गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदल्याने रस्त्यांची दयनीय स्थिती झालेली आहे. परिणामी येथील नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गॅस वाहिनीसाठी खोदकाम करीत असताना रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण करण्यात येईल,असे आश्वासन सदर कंत्राटदाराकडून देण्यात आले होते परंतु गॅस वाहिनी टाकून किमान तीन महिने उलटले तरी रस्ते सुरळीत करण्यात आलेले नाहीत. गॅस वाहिनीसाठी खोदलेल्या चरांवर फक्त माती टाकून ते रस्त्याच्या समांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या चरांवरील माती वाहून जात आहे. पुढे मुसळधार पावसात खोदकामावर टाकलेली माती पूर्णपणे जाऊन रस्त्यावर खड्डे निर्माण होणार, हे नक्की. सध्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती सखल भागातील घरांच्या आवारात येण्याचे प्रकार घडत आहेत. या समस्येवर वेळीच उपाययोजना केली नाही तर या रस्त्याची दुर्दशा अधिकच वाढणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.