काकती ब्रह्मनगरमधील प्रमुख प्रवेशद्वाराच्या गल्लीतील रस्त्याची दुर्दशा
काकती : ब्रह्मनगर येथील प्रमुख प्रवेशद्वार गल्लीच्या शेवटच्या पश्चिम टोकाला अद्यापी कच्चा रस्ता असल्याने रस्त्याची चिखलाने दुर्दशा झाली आहे. येथील रहिवाशी व शाळेच्या मुलांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. ग्राम पंचायतीने तातडीने सिमेंट काँक्रिट रस्ता करावा, अशी मागणी होत आहे. या प्रमुख रस्त्याच्या पश्चिम टोकाला केवळ दोनशे फुट लाल मुरूम टाकून मातीचा कच्चा रस्ता केला आहे. यामुळे पावसाळ्यात चिखलाची दलदल होत आहे. टू व्हिलर वाहनचालक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यासमोरच डॉ. बी. आर. आंबेडकर वसतिगृह, शाळा आहे. या चिखलातून जाऊन शाळेत बसताना मुलांना अवघड होत आहे. येथील रहिवाशांनी ग्राम पंचायत अध्यक्ष, पिडीओ आणि वॉर्डाच्या ग्राम पंचायत सदस्यांना विनंती करूनही अद्याप रस्ता केला नाही. तात्पुरती खडीची चिपिंग टाकावी. लगेच सीसी रस्ता कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.