For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजापूर बंधारा ते जुगुळ रस्त्याची दुरावस्था...

01:08 PM Dec 04, 2024 IST | Pooja Marathe
राजापूर बंधारा ते जुगुळ रस्त्याची दुरावस्था
The condition of the road from Rajapur Bandhara to Jugul...
Advertisement

अवजड वाहन वाहतुकीचा परिणाम, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Advertisement

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ते जुगुळ रस्ता खड्डेमय झाला असून भराव खचला आहे. अवजड मुरूम वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. कर्नाटकात जाण्याचा हा जवळचा मार्ग म्हणून या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ आहे. वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना नेहमी तारेवरची कसरत करत जावे लागत आहे. प्रशासनाने या रस्त्यावरील मुरूम वाहतूकीला बंदी घालून हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

शिरोळ तालुक्यातील नागरिकांना कर्नाटक राज्यात जायचे असेल तर राजापूर बंध्रायावरून जुगुळ मार्गे थेट कर्नाटक राज्यात जाता येते. राजापूर बंधारा ते जुगुळ-मंगावतीच्या रस्त्यापर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.डांबरीकरण राहिलेले नाही.मुरूम नाहीसा होऊन माती वर आली आहे. अवजड मुरूम वाहतुकीमुळे या रस्त्याची दैना झाली आहे.

Advertisement

या मार्गावर नेहमी वर्दळ असते मायाक्का चिंचणी, मंगसुळी आणि जुगुळ येथे देवदर्शनाला जाण्राया भाविकांची संख्या मोठी आहे.इतर जिह्यातील नागरिक ही या रस्त्याचा अवलंब करतात तसा हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा राज्य मार्ग आहे.मात्र या रस्त्याची दुरावस्था झाली असली तरी आजही या रस्त्यावर मोठी वाहतुक आहे.ही वाहतूक शासनाने बंद करावी अशी मागणी होत आहे.शासनाने 7 वर्षांपूर्वी बंध्रायाचे कोट्यावधी रुपये खर्च करून मजबुतीकरण केले.या रस्त्याची ही दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

रस्ता खराब झालाच; बंधाऱ्याला ही धोका.पाटबंधारे विभाग गप्प का?
कर्नाटक राज्यामध्ये मुरूम उत्खनन जोमात सुरू आहे. रात्रीच्या वेळी गणेशवाडी मार्गे मुरमाची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होते.तर राजापूर बंध्रायावरून राजरोस दिवसा मुरमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे रस्ता तर खराब झालाच आहे. बंध्रायालाही धोका निर्माण झालाच आहे.पाटबंधारे विभाग याकडे हेतू-परस्पर दुर्लक्ष करून मुंग गिळून गप्प आहे.यापाठीमागचे गौड-बंगाल काय?

Advertisement
Tags :

.