For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळांच्या पटसंख्येची अट होणार शिथिल

12:58 PM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
शाळांच्या पटसंख्येची अट होणार शिथिल
Advertisement

मराठी शाळा वाचवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Advertisement

मुंबई : प्रतिनिधी

कोकण विभागातील दुर्गम ,डोंगराळ, सागर किनारपट्टी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना उद्योगमंत्री उदय सामंत , मस्त्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मराठी शाळा वाचवण्याचा निर्णय झाला. त्या दृष्टीने इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गात कमीत कमी दहा विद्यार्थी पटसंख्या निश्चित करण्याचे ठरले तसेच पहिली ते आठवी या वर्गामध्ये कितीही विद्यार्थी असले तरी एक शिक्षक पद मंजूर करण्याचे निश्चित करण्यात आले.हा निर्णय महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यांमध्ये लागू होईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या धोरणामुळे कोकणातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा आता वाचणार आहेत. या बैठकीत कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्येची बाजू मांडून विद्यार्थी संख्या कमी असण्याच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. शाळांच्या अंतरामध्ये वस्तुस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून, विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करा अशी जोरदार मागणी केल्यानंतर पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार , तसेच नववी दहावीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थी एका वर्गात असल्यास शिक्षकाचे पद मंजूर होईल. अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला त्यामुळे कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या त्या आता सुरक्षित राहणार आहेत त्यामुळे कोकणातील अनेक मराठी माध्यमाच्या शाळा वाचणार आहेत. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यांमध्ये लागू होईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.