कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरवलीत दळवींच्या पुस्तकांवरील चर्चेचा सांगता कार्यक्रम 6 जुलै रोजी

05:43 PM Jul 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शिरोडा (प्रतिनिधी)-

Advertisement

सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आजगाव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर चालू असलेल्या खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेचा समारोप रविवार दि.6 जुलै रोजी संध्याकाळी 4.30 वाजता कै.जयवंत दळवी यांच्या आरवली येथील जन्मस्थानी होणार आहे. समारोप कार्यक्रमाच्या चर्चेस सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती अधिकारी सतीश पाटणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्टयाचे समन्वयक विनय सौदागर, कै. जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी व खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कै.दळवी यांच्या साहित्यावरील खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेत आतापर्यंत लोक आणि लौकिक, अभिनेता, अंधाऱ्याच्या पारंब्या,घर कौलारू, जळातील मासा, चक्र, उपहास कथा, वेडगळ, अथांग, सोहळा, एदीन, निराळा, जयवंत दळवींचा विनोदनामा, मिशी उतरून देईन, साहित्यिक गप्पा, परममित्र, अधांतरी, धर्मानंद, बाजार, अतृप्त, श्रीमंगलमूर्ती आणि कंपनी, सावित्री, सूर्यास्त, सारे प्रवासी घडीचे, कालचक्र, निवडक ठणठणपाळ, नातीगोती, अलाणे-फलाणे आणि भंडाऱ्याचे हॉटेल या 29 पुस्तकांवर चर्चा करण्यात आली आहे. कै.जयवंत दळवी यांच्या जन्मस्थानी होणाऱ्या ‘आत्मचरित्राऐवजी’ या गाजलेल्या पुस्तकावरील चर्चेने या मालिकेचा समारोप होणार आहे.वर्षभर चाललेल्या या साप्ताहिक खुल्या चर्चेत गोव्यातील साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर, साहित्यिक विनय सौदागर, कै. जयवंत दळवी यांचे पुतणे पुरुषोत्तम तथा सचिन दळवी, खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, ग्रंथपाल अर्चना लोखंडे, सहाय्यक ग्रंथपाल प्राची पालयेकर, लिपिक अनिष्का रगजी, कर्मचारी सुधा साळगावकर, लेखिका स्नेहा नारिंगणेकर, कवी सोमा गावडे, नामवंत गायक शेखर पणशीकर, पत्रकार अनिल निखार्गे, चोखंदळ वाचक सरोज रेडकर, गिरिधर राजाध्यक्ष, साहित्य रसिक जयदीप देशपांडे, एकनाथ शेटकर, अविनाश जोशी, दिलीप पांढरे, प्रकाश मिशाळ, तसेच विद्यार्थी वाचक श्रीपल्ली लोखंडे व मिहीर नाईक यांचा नियमित सहभाग होता. या व्यतिरिक्त अन्य काही साहित्य रसिकही अधूनमधून चर्चेस उपस्थित राहिले.संपूर्ण महाराष्ट्रात आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा व शिरोडा येथील खटखटे ग्रंथालय या दोनच संस्थांनी कै.जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी दळवींच्या एकूण सत्तर पुस्तकांपैकी तीस पुस्तकांवर चर्चा करून नाविन्यपूर्णरित्या वर्षभर साजरी केली.या खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेच्या समारोपच्या चर्चेस वाचक तथा साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विनय सौदागर, सचिन दळवी व सचिन गावडे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article