पवित्र झऱ्याचे रक्षण करणारा समुदाय
हातात काठी, चेहऱ्यावर मुखवटा
आदिवासी समुदाय वन्यप्राण्यांपासून जंगलात असलेल्या खास वनौषधींचे रक्षण करत असतात. आता एका आदिवासी समुदायाचे लोक झऱ्याचे रक्षण करताना आढळून आले आहेत. डेनियल पिंटो या व्लॉगरने या समुदायाच्या लोकांशी संपर्क साधत याबाबत जाणून घेतले आहे. पापुआ न्यू गिनीच्या पर्वतीय क्षेत्रातील तोवाई समुदायाच्या स्पिरिट बर्ड्सकडून या झऱ्याचे रक्षण केले जाते. पवित्र झऱ्याचे रक्षण करण्यासाठी समुदायाचे लोक तेथे पहारा देत असतात. कुठलाही बाहेरील व्यक्ती येथे येऊन त्याने झऱ्याच्या पावित्र्याला धक्का पोहोचवू नये म्हणून हा पहारा दिला जात असतो. परंतु हे लोक दिसण्यास अत्यंत भीतीदायक वाटत असतात. या झऱ्याच्या समोर मुखवटा परिधान केलेले आणि हातात काठी घेऊन उभे असलेले समुदायाचे लोक दिसून येतात. या लोकांकडून एखाद्याला नुकसान पोहोचविले जाणार नाही याची कुठलीच खात्री देता येत नसल्याचे व्लॉगरने म्हटले आहे. डेनियलच्या या रीलला आतापर्यंत 5 कोटी 40 लाखाहून अधिक ह्यूज आणि 10 लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तर याच्या या पोस्टवर 13 हजार कॉमेंट्स आल्या आहेत. पापुआ न्यू गिनीच्या पर्वतीय क्षेत्रात वीई टोवाई समुदायाच्या स्पिरिट बर्ड्सकडून या झऱ्याचे रक्षण केले जाते. हा समुदाय स्वत:च्या निसर्गरक्षणाच्या प्रयत्नांसाठी ओळखला जातो. संबंधित झरा या समुदायाकरता अत्यंत पवित्र मानला जात असल्याने त्याचे रक्षण करण्यात येते.