महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डेंग्यु रुग्णांच्या मृत्यूंचा तपास करणार समिती

12:15 PM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोमेकॉत अलिकडच्या काळात डेंग्यु झालेल्या 17 रुग्णांच्या मृत्यूंची चौकशी करण्याचा आदेश सरकारने दिला असून आरोग्य खाते आणि गोमेकॉमधील डॉक्टर्सची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून तपासाचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असून त्याकरीता एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. नवे-वाडे, वास्को येथील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू गोमेकॉत झाल्यानंतर तो डेंग्यूमुळे झाला आणि चिखली-वास्को येथील उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्याकडे डॉक्टर्सनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी वास्कोतील लोकांनी आवाज उठवल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. चिखली हॉस्पिटलात आरोग्य सुविधांचा तसेच कर्मचारी, डॉक्टर्सचा अभाव असल्याचे तेथील आमदार तथा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी निदर्शनास आणले. याप्रकरणी त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना घरचा अहेर दिल्यानंतर सरकरने त्याची गंभीर दखल घेत डेंग्यु बळींची चौकशी करण्याचे ठरविले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article