वाहणाऱ्या नदीचा बदलतो रंग
आग अन् बर्फाच्या भूमीवर आहे जादुई खोर
आइसलँडला ‘आग आणि बर्फा’ची भूमी म्हटले जाते. येथे एक जादुई खोरे असून याचे नाव स्टुअलागिल आहे. हे खोरे जोकुलडालुर भागात आहे. स्वत:च्या स्तंभाकार बेसाल्ट पर्वत आणि त्यामधून वाहणाऱ्या जोल्का नदीसाठी हे ओळखले जाते. ही नदी ऋतुनुसार रंग बदलत असते. याच्या चहुबाजूचे दृश्य अत्यंत अद्भूत असून ते एखाद्या अन्य ग्रहाप्रमाणे दिसते. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आग आणि बर्फाच्या धरतीवर हे विशाल स्तंभ उभे आहेत. प्राचीन ज्वालामुखींमुळे निर्माण झालेले एक पार्थेनन, हे स्तंभ बेसाल्टने तयार झाले आहेत. आइसलँडमधील हे स्टुअलागिल खोरे असल्याचे याच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे.
स्टुअलागिल खोरे आइसलँडच्या रत्नांपैकी एक आहे. याची निर्मिती नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झाली होती. या नदीची पातळी अत्यंत अधिक असल्याने हे क्षेत्र धोकादायक मानले जायचे. आइसलँडमध्ये बेसॉल्ट कॉलम्सची सर्वाधिक संख्या स्टुअलागिल खोऱ्यातच असल्याचे मानले जाते. येथे स्टडलाफॉस नावाचा एक सुंदर झरा देखील असून तो अत्यंत पाहण्याजोगा आहे.
या खडकांमधून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा रंग ऋतुनसार बदलत असतो. मार्च ते जुलैपर्यंत या पाण्याचा रंग निळा-हिरवा असतो. तर उन्हाळ्याची अखेर सुरू होताच ग्लेशियरमधून वितळून आलेले पाणी वाढते आणि नदीचा रंग करड्या रंगात बदलतो. या खोऱ्याचे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक येत असतात.