पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण
जेव्हा आम्ही अत्यंत अधिक थंडीविषयी विचार करतो, तेव्हा आमच्या नजरेसमोर अंटार्क्टिकाचे चित्र उभे राहते. परंतु पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, जेथे कुठलेच रोप, कुठलाही प्राणी किंवा कुठलीही स्थायी मानवी वस्ती जिवंत राहू शकत नाही. हे ठिकाण आहे ईस्ट अंटार्क्टिक पठार. येथील उंच शिखरांना रिज ए नावाने ओळखले जाते, जे डोम आर्गस आणि डोम फूजीदरम्यान स्थित आहे.
पृथ्वीवर आतापर्यंत सर्वात थंड नैसर्गिक तापमान कुठल्याही संशोधन स्थानकावर नोंदविण्यात आले नव्हते, तर ईस्ट अंटार्क्टिक पठारावर सॅटेलाइट सेंसरद्वारे नोंदविण्यात आले होते. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3900 ते 4093 मीटर उंचीवर आहे. डोम आर्गस किंवा रिज ए नावाने ओळखले जाणारे हे क्षेत्र अत्यंत वेगळे आहे.
उपग्रहीय डाटाचे विश्लेषण करणाऱ्या वैज्ञानिकांना हिवाळ्यात रिज एवरील पृष्ठभागाचे तापमान उणे 93.2 अंशापर्यंत खालवत असल्याचे आढळून आले. साफ आणि कोरड्या परिस्थितींमध्ये हे उणे 98 अंशापर्यंत कमी होण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. आता सॅटेलाइट स्क्रीन तापमान मोजत असल्याने याला अधिकृत नोंद मानले गेले नव्हते. जागतिक हवामानशास्त्र संघटना 1983 मध्ये अंटार्क्टिटकामध्येच वोस्तोक संशोधन केंद्रावर नोंदविण्यात आलेल्या उणे 89.2 अंशालाच पृथ्वीवर नोंदविण्यात आलेले सर्वात कमी तापमान मानते.
इतके थंड का?
4000 मीटरच्या उंचीवर हवा कोरडी जात होते, याचा अर्थ ही उष्णता रोखू शकत नाही. कुठलीही उष्णात वेगाने अंतराळात फैलावते ज्यामुळे तापमान खालावते. याचबरोबर ईस्ट अंटार्क्टिकाच्या अंतर्गत हिस्स्यात दीर्घकाळापर्यंत हिवाळ्यात कुठलेच ढग असत नाहीत. ढगांशिवाय जी उष्णता पृष्ठभागावरून परावर्तित होते, ती केवळ वातावरणात गायब होते. याचबरोबर या भागात जवळपास वारे वाहतच नाहीत. शांत हवा, थंड हवेला गोठू देते आणि उथळ ख•dयांमध्ये अडकते. यामुळे येथे अधिक थंडी असते. तसेच स्वत:च्या बर्फाळ स्थितीच्या उलट हा भाग पृथ्वीच्या सर्वात कोरड्या वाळवंटापैकी एक आहे. येथे दरवर्षी केवळ 1-3 ती सेंटीमीटर हिमवृष्टी होते, कोरडी हवा इंन्सुलेशनचे काम करते आणि रेडिएटिव्ह कुलिंगला आणखी तीव्र करते.
जीवनाच्या खुणा नाहीत
अत्यंत थंडी, पातळ एटमॉस्फेयर आणि 6 महिन्यांच्या पूर्ण काळोख्या रात्री या भागाला वास्तव्ययोग्य करत नाहीत. किनारी अंटार्क्टिकाच्या उलट जेथे पेंग्विन, सील आणि शेवाळ जिवंत राहतात, पूर्व अंटार्क्टिक पठाराच्या केंद्रस्थानी कुठलेही रोप किंवा जीव आढळून येत नाही.