डिसेंबरच्या थंडीने पकडला जोर!
राजस्थानपासून काश्मीरपर्यंत पारा घसरला : उत्तर प्रदेश-झारखंडमध्ये धुके, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदा थंडीने उशिराने धडक दिली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. उत्तर भारतात सकाळी आणि रात्री वातावरण थंड होत आहे. किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी घसरण होत आहे. देशाच्या वरच्या भागात म्हणजेच काश्मीरमध्ये तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे. त्याचबरोबर मध्य भारतातील वाळवंटी क्षेत्रातही तापमानात घट झाली आहे. याशिवाय देशाची राजधानी दिल्लीतही थंडीने आपला प्रभाव दाखवायला सुऊवात केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. गुलमर्ग या पर्यटनस्थळावर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. रविवारी कोंगदोरी परिसरात पारा -4 अंशांवर पोहोचला. गुलमर्गला पोहोचलेले पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बर्फवृष्टीच्या तडाख्यात रस्ते बंद झाल्यामुळे काही भागात पर्यटक अडकल्याचीही नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते ठप्प झाले आहेत. गुरेझ खोऱ्यातील बर्फ हटवण्यात प्रशासन व्यस्त आहे. त्याचबरोबर माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी बर्फवृष्टीचा आनंद लुटला. तेथील व्हिडिओही समोर आले आहेत.
माउंट अबूमध्ये पारा शून्याखाली
राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा -1 अंशावर पोहोचला आहे. सुमारे तीन अंश सेल्सिअसच्या घसरणीमुळे येथे थंडीची तीव्रता वाढली. शनिवारी येथील किमान तापमान 2 अंश सेल्सिअस होते. मात्र, राज्यात थंड वारे येणे थांबले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्येही थंडी वाढली आहे. मध्य प्रदेशात तर तामिळनाडूत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
झारखंडमध्ये धुके
झारखंडमध्ये हवामानात सातत्याने बदल होत असून तेथे बहुतांश ठिकाणी धुके पसरलेले दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळपासून राज्यात थंड वारे वाहत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिह्यांमध्ये कडाक्मयाची थंडी जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. राजधानी रांचीला लागून असलेल्या भागात किमान तापमान रविवारी चार अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर राजधानी रांचीचे किमान तापमानही आठ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. झारखंडमध्ये बहुतांश भागात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने लोक थंडीच्या गर्तेत आहेत. उत्तर-पश्चिमी वाऱ्यांमुळे तापमानात ही घसरण झाल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.
मध्यप्रदेशात पावसाचा अंदाज
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या सात दिवसांत उत्तर भारतात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहेत. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येईल. 22 डिसेंबरला ही मजबूत यंत्रणा सक्रिय होण्याची शक्मयता असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे 23-24 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक भागात हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने तामिळनाडूतील अनेक भागातही हलक्मया ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी येथे पाऊस झाला. रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी तिऊनेलवेली येथे जोरदार पाऊस झाला.