For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राण्याच्या मलाने तयार होते कॉफी

06:22 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्राण्याच्या मलाने तयार होते कॉफी
Advertisement

किंमत कळल्यावर बसेल धक्का

Advertisement

जगभरात कॉफी पसंत करणारे लोक नेहमीच दुर्लभ आणि अनोख्या ब्रूच्या शोधात असतात. परंतु जगातील सर्वात महाग कॉफीच्या मागे एक कहाणी आहे. कोपी लुवाक अशा कॉफी बीन्सचा वापर करून तयार केले जाते, जे आशियाई पाम सिवेटच्या डायजेस्टिव सिस्टीमला सामोरे गेलेले असतात. हा एक छोटा मांजरासारखा सस्तन प्राणी असून तो इंडोनेशिया आणि दक्षिणपूर्व आशियाच्या अन्य हिस्स्यांमध्ये आढळून येतो. स्थानिक स्वरुपात याला लुवाक नावाने ओळखले जाते. हा प्राणी केवळ सर्वात पिकलेल्या आणि सर्वात चांगल्या गुणवत्तेच्या कॉफी चेरीलाच खाण्यासाठी निवडत असतो.

सिवेट प्राणी एक नैसर्गिक गुणवत्ता निरीक्षकाप्रमाणे काम करतो. हा स्वत:च्या सवयीद्वारे कमी गुणवत्ता असलेल्या चेरीला टाळतो आणि केवळ सर्वात चांगले फळच खात असतो. यामुळे केवळ प्रीमियम बीन्सच प्रॉडक्शन प्रोसेसमध्ये जातात. सिवेट कॉफी चेरी खातो तेव्हा फळाचे बीन्स शाबूत राहतात. प्राण्याच्या पोटात नैसर्गिक एंजाइम फर्मेंटेशन प्रक्रिया सुरू होते, हे बीन्समध्ये काही प्रोटीन्सना तोडते, ज्यामुळे कडवटपणा कमी होतो आणि एक स्मूथ आणि अधिक रिच फ्लेवर तयार होतो.

Advertisement

पचनानंतर बीन्स प्राण्याच्या मलासोबत बाहेर पडतात, त्यांना काळजीपूर्वक एकत्र केले जाते आणि चांगल्याप्रकारे धुवून उन्हात सुकविले जाते आणि मग त्यांना भाजले जाते. अंतिम उत्पादन अधिक हायजीनिक आणि पिण्यासाठी सुरक्षित असते. हे अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने महाग आहे. सिवेट अत्यंत कमी प्रमाणात वापरण्यायोग्य बीन्स बाहेर काढतात आणि त्यांना एकत्र करण्याची प्रक्रियाही अत्यंत मंदगतीची आणि मेहनतपूर्ण आहे. उत्पादन वाढविता येत नसल्याने याचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. यामुळे हे उत्पादन लक्झरी श्रेणीत मोडते.

आंतरराष्ट्रीय बाजारात या कॉफीची किंमत 60 हजार ते 70 हजार रुपये प्रतिकिलोइतकी अधिक आहे. विदेशात लक्झरी कॅफे आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक कप कॉफीची किंमत 3,000 ते 5,000 रुपयांदरम्यान असू शकते.

Advertisement
Tags :

.