जयगड ते पूर्णगडपर्यंत किनारी भाग आता विकास केंद्र
रत्नागिरी :
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने जून महिन्यात कोकणातील प्रस्तावित किनारी मार्गांच्या आसपास नवी 6 विकास पेंद्रे जाहीर केली आहेत. नवनगर ही कायद्यातील संकल्पना ग्रामीण क्षेत्राला लागू झाली आह़े यामध्ये तालुक्यातील जयगडपासून पूर्णगडपर्यंतच्या किनारी भाग विकास केंद्र म्हणून जाहीर करण्यात आला आह़े निम्म्याहून अधिक रत्नागिरी तालुका विकास केंद्र म्हणून घोषित झाला आह़े यामुळे या क्षेत्रात नियोजन प्राधिकरण म्हणून नगर रचनाकार यांचे कार्य संपुष्टात येणार आह़े
नियोजनविषयक सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाले आह़े लोकांना त्यांची घरे नव्याने बांधायची असतील किंवा असलेल्या घराची पुनर्बांधणी करायची असेल तरी रस्ते विकास महामंडळाची अनुमती घ्यावी लागणार आह़े सामान्य माणसाला पडवीसारखे घराचे वाढीव बांधकाम करायचे असेल तरी रस्ते विकास मंडळाची मान्यता आवश्यक ठरणार आह़े यापूर्वी नवीन गणपतीपुळे विकास पेंद्र म्हणून घोषित करण्यात आले होत़े त्यावेळी नेवरे, भगवतीनगर, गणपतीपुळे, धामणसे, भंडारपुळे, निवेंडी, ओरी, तळेकरवाडी ही गावे त्यात समाविष्ट करण्यात आली होत़ी मुंबईमध्ये एम़ एम़ आऱ ड़ी के सारखी नियोजन व विकास प्राधिकरणे कार्यरत आहेत़ तसे प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ कार्यरत राहणार आह़े
नवीन गणपतीपुळे विकास पेंद्रामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 89 गावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत़ यामध्ये जयगड, कुणबीवाडी, नांदिवडे, सत्केंडी, साखर मोहल्ला, सांडेलावगण, कासारी, मराठवाडा, संदखोल, चाफेरी, पन्हळी, वाटद, निरवणे, गडनरळ, कचरे, कांबळे लावगण, कोळीसरे, उंडी, रीळ, देऊड, आगरनरळ, मराठवाडा, कळझोंडी, वरवडे, चवे, भंडारवाडी, चाफे, खारवीवाडा, खालगाव, मराठवाडी, विल्ये, भंडारवाडा, आगवे, तरवळ, माईंगडेवाडी, माचिवलेवाडी, जांभरुण, नरबे, खरवते, कोतवडे, वेतोशी, ढोकमळे, उंबरवाडी, वेतोशी खालचीवाडी, मधलीवाडी, वाडाजून, सड्यो, आरे, भावेआडोम, पिरंदवणे, भोके, बसणी, मधलीवाडी, मयेकरवाडी, दांडेआडोम, केळ्यो, आंबेकरवाडी, कासारवेली, काळबादेवी, केंडफणसवणे, सडामिऱ्या, शीळ, साखरतर, म्हामूरवाडी, शिरगांव, तारवेवाडी, जाकिमिऱ्या, आडी, केळशी, हातखंबा, मिरजोळे, मिऱ्या, तिवंडेवाडी, मधलीवाडी, पानवल, कारवांचीवाडी, कुवारबाव, पोमेंडीखुर्द, पोमेंडी बुद्रुक, मुसलमानवाडी, भोळेवाडी, मजगाव, ठिकाणदात्ये, पडवेवाडी, चिखलवाडी, मालगुंड, रहाटघर, मुसलमानवाडी या 89 गावांचा समावेश करण्यात आला आह़े
यापूर्वी 13 विकास केंद्रे घोषित करण्यात आली होती. त्यात 6 केंद्रांचा समावेश करण्यात आला आह़े रत्नागिरी तालुक्याचा उत्तर भाग विकास केंद्र म्हणून जाहीर झाल्यामुळे नियोजन व विकास प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला सार्वजनिक विकासाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत़ याशिवाय रत्नागिरी तालुक्यातील भाट्यो विकास केंद्राची घोषणा करण्यात आली आह़े त्यामध्ये 20 गावांचा समावेश करण्यात आला आह़े कर्ले म्युन्सीपल बाहेर, भाट्यो, मुसलमानवाडी, कसोप, फणसोप, गोळप, वायंगणी, पावस, गणेशगुळे, कुर्धे, मेर्वी, पूर्णगड, पेठ पूर्णगड, रनपार, मुसलमानवाडी, नालेवठार, ठिकाण चक्रदेव, ठिकाण सोमण, ठिकाण बेहरे, जांभुळआड या सर्व गावांमध्ये नियोजन व विकास प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळ काम करणार आह़े
- विकास केंद्रांची हद्दवाढ
यापूर्वी राज्य सरकारने सिडको, औद्योगिक विकास महामंडळ यांची नियोजन प्राधिकरण म्हणून निवड करण्यात आली होत़ी त्याऐवजी रस्ते विकास महामंडळाकडे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आल़ी किनारपट्टी महामार्ग आणि कोकण दृतगती महामार्ग यांच्या लगतच्या विकास केंद्रांची हद्दवाढ करुन घेण्यात आली आह़े