For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुळे श्री राक्षस मल्लिकेश्वराची पिंडिका फेकली झुडपात

12:31 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुळे श्री राक्षस मल्लिकेश्वराची पिंडिका फेकली झुडपात
Advertisement

कुळे पोलिसांकडून संशयिताची चौकशी

Advertisement

धारबांदोडा : मेटावाडा-कुळे येथील श्री राक्षस मल्लिकेश्वर मंदिरापासून सुमारे दीडशे मीटरच्या अंतरावर असलेली मूळ स्थानावरील पिंडिका उचलून बाजूच्या झुडपात फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित म्हणून श्रीमंत पाटील याच्याविऊद्ध देवस्थान समितीने कुळे पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.देवस्थानचे अध्यक्ष आपा गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षस मल्लिकेश्वर मंदिरापासून सुमारे दीडशे मीटरच्या अंतरावर प्राचिन काळातील मल्लिकेश्वर देवाचे मूळस्थानी छोटे मंदिर आहे. या मंदिरात पूजाविधी केल्यानंतरच राक्षस मल्लिकेश्वर मंदिरात कालोत्सव व शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या स्थानाला विशेष महत्त्व आहे.

मंदिरातील पिंडिका मूळ स्थानावऊन गायब झाल्याची माहिती मिळाल्यानंतर समितीने शोधाशोध सुरू केली. कदाचित पिंडिका चोरीला गेली असावी, असा संशयही व्यक्त करण्यात आला. मात्र देवस्थानचे काही सदस्य मंदिराच्या सभामंडपात बसून त्याच विषयावर चर्चा करीत होते. यावेळी मंदिराच्या जवळच राहणारा श्रीमंत पाटील आपल्या घरी जात असताना सभामंडपात जमलेल्या सदस्यांना पाहून तेथे आला. कसली चर्चा चालली आहे, याची त्याने चौकशी केली. उपस्थित सदस्यांनी त्याला घडला प्रकार सांगितला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सदर प्रकार आपण केल्याचे त्याने मान्य केल्यानंतर सर्वजण अचंबित झाले. पिंडिका उचलल्याचे मान्य करतानाच, उलट त्याबाबत तुम्ही काही चिंता करू नका अशी उडवाउडवीची उत्तरेही त्याच्याकडून ऐकायला मिळाली.

Advertisement

घडल्या प्रकाराबद्दल सदस्यांशी सल्लामसलत करून पोलीस तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती आपा गावकर यांनी दिली आहे. आसपासच्या भागातील मंदिरात चोऱ्या होत असून काही ठिकाणी मूर्त्यांची तोडफोडही होत आहे. त्या दृष्टीनेही संशयित व्यक्तीची कसून चौकशी करण्याची मागणीही आपा गावकर यांनी केली आहे. शनिवारी देवस्थान समितीच्या बैठकीत पुढील कृती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांना विचारले असता, संशयित पाटील याला पोलीस स्थानकात बोलावून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.