महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहराला इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षाच

10:52 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यावरणपूरक बसपासून परिवहन महामंडळ वंचित : दैनंदिन प्रवासात अडचणी

Advertisement

बेळगाव : बहुचर्चेत असलेल्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची शहराला अद्याप प्रतीक्षाच लागली आहे. मागील कित्येक महिन्यापासून परिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल होणार ही केवळ अद्याप चर्चाच आहे. राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, दावणगेरी आणि दक्षिण कर्नाटकातील काही मार्गांवर इलेक्ट्रिक बस धावू लागल्या आहेत. मात्र बेळगाव परिवहनला अद्याप प्रतीक्षाच करावी लागली आहे. शासनाने बेंगळूरबरोबर बेळगाव, हुबळी, मंगळूर शहरात इलेक्ट्रिक बस धावणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप बेळगाव शहराला इलेक्ट्रिक बसपासून दूर रहावे लागले आहे. प्रदूषण टाळण्याबरोबर खर्चाची बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती दिली जात आहे. दरम्यान, परिवहनच्या ताफ्यातदेखील इलेक्ट्रिक बस दाखल होणार अशा चर्चा सुरू होत्या. शासनाकडून देखील याला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. मात्र अद्याप इलेक्ट्रिक बस राज्यातील मर्यादित शहरांमध्येच धावत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

बेळगाव परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बस सेवेवर दैनंदिन ताण वाढू लागला आहे. त्यातच शक्ती योजनेचा भार असल्याने बससेवेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. दरम्यान, ताफ्यात आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसचा भरणाही अधिक आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासात अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यास दैनंदिन बस सेवेवरील ताण काहीसा कमी होणार आहे. त्याबरोबर प्रवासही सुखकर होणार आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट आदी जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रिक बससाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, खासगी संस्थांनी रकमेची मागणी केल्याने ही निविदा प्रक्रियाही रेंगाळल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या दिवसात तरी बेळगावला इलेक्ट्रिक बस मिळणार का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडू लागला आहे.

परिवहनच्या उत्पन्नात होणार वाढ

आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवहनला इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यानंतर उत्पन्नात वाढ होणार आहे. इंधन बचतीमुळे परिवहनलाही दिलासादायक बाब आहे. इंधन आणि इतर देखभालीचा खर्चही कमी होणार असल्याने परिवहनसाठी इलेक्ट्रिक बस सोयीस्कर ठरणार आहे. मात्र अद्याप बेळगाव परिवहनला या बसेसपासून चार हात लांबच रहावे लागले आहे.

बेळगाव शहरासाठी 50 इलेक्ट्रिक बस 

बेळगाव शहरासाठी 50 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. बेंगळूर शहरात इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच बेळगाव शहरातही इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. याबाबत सर्व पाठपुरावा करण्यात आला आहे.

- ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article