For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुढीपाडव्यासाठी शहर सज्ज

10:28 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुढीपाडव्यासाठी शहर सज्ज
Advertisement

घरोघरी आज उभारणार गुढी : नवीन वस्तू खरेदीला बहर

Advertisement

बेळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. हिंदु नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारून सण साजरा करण्यासाठी आनंद शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी सूर्योदयानंतर दारामध्ये गुढी उभारून पूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळाली. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषत: नवीन खरेदीवर भर दिला जाणार आहे. नवीन घरकुल, सोने-चांदी, इलेक्ट्रीक-इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा उत्साह वाढला आहे. गुढी उभारण्यासाठी लागणारे वस्त्र, गुढी, ताम्हण तांब्या खरेदीसाठी बाजारात लगबग पाहावयास मिळाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी आणि नवीन कामांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे मंगळवारी सणासाठी सर्वत्र लगबग दिसून येणार आहे. सोमवारी बाजारात गुढीपाडव्याच्या खरेदीबरोबरच गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या काठ्या, वस्त्र, कडुलिंब आणि आंब्याच्या डहाळ्यांचीही खरेदी करण्यात आली.

विविध धार्मिक कार्यक्रम

Advertisement

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंदिरांतून अभिषेक, पूजा-अर्चा आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे भाविकांची वर्दळही पाहावयास मिळणार आहे. पाडव्याच्या निमित्ताने मंदिरे फुलून जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.