For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कपाट अंगावर पडल्याने बालक ठार ! परिसरात हळहळ

01:55 PM Aug 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
कपाट अंगावर पडल्याने बालक ठार   परिसरात हळहळ
The child was killed
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

घरात खेळ असलेल्या चार वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर अचानक कपड्याचे कपाट पडल्याने गंभीर जखमी झालेल्या बालकाचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला. लहानग्याच्या अशा प्रकारच्या मृत्युमुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

अधिक मिळालेल्या माहीतीनुसार, विराज रविंद्र म्हाळूंगेकर (रा. शाहुनगर, काळम्मावाडी वसाहत, कागल) हा चिमुकला घरामध्ये खेळत असताना त्याच्या अंगावर घरातील कपाट अचानक पडले. या घटनेमध्ये गंभीर झखमी झालेल्या विराजला नातेवाईकांनी उपचारासाठी त्वरीत सीपीआर रूग्णालयात दाखल केले होते. पण उपचारापूर्वीच त्या बालकाचा मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यांची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.