For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : ताफा मुख्यमंत्र्यांचा, शिक्षा मात्र मुक्या जनावरांना

02:03 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   ताफा मुख्यमंत्र्यांचा  शिक्षा मात्र मुक्या जनावरांना
Advertisement

                             मुख्यमंत्री दौऱ्यामुळे बुधगाव रस्त्यावर ऊस वाहतूक ठप्प

Advertisement

बुधगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत आले. मात्र त्यांच्या वाहनांनाचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार होता त्या मार्गावरील ऊस वाहतुकीची वाहने दोन तीन तास अडवून ठेवण्यात आली.

त्यामुळे भर उन्हात मुकी जनावरे आणि फडकरी रस्त्यावर अडकून पडले होते. शनिवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कवलापूर विमानतळावर आगमन होणार होते.त्यानंतर बुधगाव, माधवनगर मार्गे स्टेशन चौकातप्रचार सभेसाठी ते जाणार असल्याने त्यांच्या वाहनांनाचा ताफ्याला अडथळा होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घेतली होती.

Advertisement

वाहनांचा ताफा येण्यापूर्वीच तासभर बैलगाड्या आणि ट्रॅक्टर बुधगाव बिसुर रस्त्यावर थांबवण्यात आल्या. भल्या पहाटे ऊस तोडून गाड्यांमध्ये भरून जाणाऱ्या फडकऱ्यांच्या खाण्य-पिण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण काहीच पर्याय नसल्याने जनावरांबरोबर बिचारी माणसंही सायबांचा ताफा जाण्याची बाट पाहत बसली होती.

Advertisement
Tags :

.