For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ऊसदराचा तोडगा काढूनच मुख्यमंत्र्यांनी परतावे!

06:19 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊसदराचा तोडगा काढूनच मुख्यमंत्र्यांनी परतावे
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

ऊसदराच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सुवर्णविधानसौध येथे बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य व केंद्र सरकारने एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याऐवजी समन्वयातून ऊसदराचा प्रश्न निकाली काढावा. बैठकीत ठोस निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी परतावे, अन्यथा त्यांच्या वाहनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

दिल्ली येथे ऊसदराच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांना केवळ चहापान करून माघारी पाठविण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. बेळगावमध्ये होणाऱ्या बैठकीत अशाप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केवळ चर्चा करून किंवा आश्वासने देऊन बैठक संपविण्याऐवजी ऊसदराचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लावावा, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांनी मांडली आहे.

Advertisement

ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, खते-बियाण्यांच्या किमती, मजुरी आणि अन्य कृषी निविष्ठांवरील खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. मात्र ऊसदर निश्चित करण्याच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे सुवर्णविधानसौधात होणाऱ्या बैठकीत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढूनच बेळगावमधून परतावे. बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी तोडगा न काढता परतण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या वाहनासमोर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले जाईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.