For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईडीने केलेल्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही

06:50 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईडीने केलेल्या कारवाईशी  मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

मुडावर ईडीने केलेली कारवाई व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा संबंध नाही. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला नाही. त्यांनी मुडावर छापा टाकला आहे. त्यामुळेच या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

Advertisement

हुक्केरी येथे पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली असून मुडा कार्यालयातील कागदपत्रे सरकारजवळ असतात, ती गहाळ होणार नाहीत. ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना जे हवे आहे ते त्याची चौकशी करीत असतात.

मंत्री भैरती बसवराज यांनी कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. ईडीच्या चौकशीनंतरच या आरोपाची सत्यता समजणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करायची आहे, आम्हाला घाई नाही. खरेतर हे प्रकरण ईडीच्या अखत्यारित येत नाही, असा अभिप्राय आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेच आदेश द्यावा, असे सांगतानाच हे प्रकरण सीबीआयकडे गेले तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.