बौद्धिक अक्षम असूनही त्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल व प्रगती हे थक्क करणारे - काटेकर
सातारा :
3 डिसेंबर ते 8 डिसेंबर हा ठजागतिक दिव्यांग सप्ताहठ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या सप्ताहाचे औचित्य साधून सातारा येथील कर्ण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने बौद्धिक अक्षम असण्राया परंतु स्वत?च्या पायावर उभे राहण्याचा मनापासून प्रयत्न व धडपड करण्राया रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन विशेष मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सूरज सुदाम चव्हाण व तेजस अविनाश भोज अशा दोन दिव्यांगांचा व त्यांना उभारी देण्राया व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी झटण्राया जुनी एम्.आय.डी.सी.- सातारा येथील मुंदडा पेपर कंपनी- चे व्यवस्थापक उमेश मुंदडा यांचा सत्कार गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या शुभहस्ते शाल बुके व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले .
यावेळी श्रीरंग काटेकर म्हणाले की, बौद्धिक अक्षम असून सुद्धा या मुलांची जिद्द , मेहनत आणि सचोटी याच्या जोरावर त्यांनी स्वत?च्या जीवनामध्ये केलेले बदल आणि केलेली प्रगती ही थक्क करणारी आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी मागील 10-11 वर्षांपासून त्यांच्या या प्रयत्नांना मुंदडा पेपर कंपनीने रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना दिलेले पाठबळ हे सगळंच थक्क करणारे आहे. त्यामुळे उद्योजक उमेश मुंदडा, उद्योजक योगेश मुंदडा व विशेषत? त्यांच्या मातोश्री श्रीमती मुंदडा भाभी यांनी या मुलांसाठी घेतलेले प्रामाणिक कष्ट याला तोडच नाही. त्यामुळे संपूर्ण मुंदडा परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मुंदडा पेपरचे व्यवस्थापक उमेश मुंदडा म्हणाले की, बौद्धिक दृष्ट्या अक्षम असून सुद्धा या मुलांनी त्यांच्या कामामध्ये असणारे सातत्य, प्रामाणिकपणा व सचोटी ही अतिशय वाखणण्याजोगी आहे. त्यांच्यात असणारे हे गुण आमच्या व्यवसायाला उभारी देणारे असे आहेत. सर्वसाधारण व्यक्तीलाही लाजवतील अशी कौशल्ये या दोघांच्यातही असून आज या दोघांना स्वत?च्या पायावर उभे करणे हे आमच्यासाठी खूप पुण्याचं काम आहे. यापुढेही मुंदडा परिवार नेहमी त्यांच्या पाठीशी राहील. असे म्हणून त्यांनी या दोघांच्याही पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापूरे म्हणाले की, ठजिथे कमी तिथे आम्हीठ या उक्तीप्रमाणे आमची संस्था कायमच उपेक्षित व दुर्लक्षित घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असते. आज सूरज व तेजस या मुलांना प्रत्यक्ष काम करताना पाहून आणि त्यांना मुंदडा परिवाराने कामगार न मानता त्यांच्याच परिवारातील सदस्या प्रमाणे त्यांच्यासोबत केलेले वर्तन पाहून मन भारावून गेले आहे. असे म्हणून त्यांनी मुंदडा परिवाराला मनापासून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास कर्ण फाऊंडेशनचे कुमार लोखंडे, दत्तात्रय सांगलीकर, हेमंत जोशी, विजयकुमार कुलकर्णी, सुनीता कोल्हापुरे, सिद्धी कोल्हापूरे - जाधव आदी उपस्थित होते.
शारीरिक विकलंगतेवर मात करीत सुरज चव्हाण व तेजस भोज यांनी प्रतिकूलतेवर मात करीत स्वत?च्या कर्तृत्वावर उद्योग विश्वात नोकरी करीत आहेत शारीरिक विकलंग असणारे सुरज व तेजस भोज यांनी इतरांपुढे एक आदर्श ठेवला आहे शरीराने जरी यांना विकलंगत्व आले असले तरी ते मनाने खंबीर आहेत हेच यातून सिद्ध होते.