For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ई-कचऱ्याचे आव्हान ; प्रबोधनाची गरज

12:03 PM Jun 05, 2025 IST | Radhika Patil
ई कचऱ्याचे  आव्हान   प्रबोधनाची गरज
Advertisement

कोल्हापूर / अवधुत शिंदे : 

Advertisement

माहिती - तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, मोबाईल, टी. व्ही., रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन या इलेक्ट्रॅानिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही उपकरणे कालांतराने खराब होतात किंवा कालबाह्य होतात आणि त्यातून जो कचरा निर्माण होतो त्याला इलेक्ट्रॉनिक वेस्ट असे म्हणतात. ई वेस्ट हे सध्या जगासमोर उभे असलेले एक गंभीर पर्यावरणीय संकट आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाने 1 मे 2012 ला दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक व ठाणे शहरात ई-कचरा निर्मुलनासाठी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोल्हापुरात मात्र जागोजागी भंगार जमा करणाऱ्यांकडून ई-कचऱ्यातून मिळणारे गुंजभर सोने, चांदी, तांबे, लोखंड, अॅल्युमिनियम आदी धातूंच्या आमिषाने खराब झालेले टिव्ही, कॉम्युटर, फ्रिज, मोबाईल, .सी. वायर्स, सीडी, बल्ब, आदींची अशास्त्राrय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. कॅथॉड रे ट्युब, पीबीसी बोर्ड, चिप्स् व इतर वस्तूंचा सोन्याचा मुलामा असलेले घटक, वायर्स, टोनर, स्टिल रोलर आदी ईकचऱ्यातील घटकांतून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी संपूर्ण शहरातील पर्यावरण बिघडण्याचा उद्योग सुरु आहे.

Advertisement

यातून मिळणाऱ्या धातूंसाठी याची मोडतोड करुन जाळण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत. सहजासहजी न मिळणाऱ्या धातूसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना नायट्रिक व हायड्रोक्लोरिक ?सिडमध्ये बुडविले जाते. या प्रकाराने वातावरणात डायऑक्सिन हा विषारी वायू मोठ्या प्रमाणात मिसळल्याने पर्यावरण बिघडण्याबरोबरच आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. वास्तवित ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वारज्य संस्थेची असूनही त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याचा आरोप होता. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या समस्येवर उपाय योजना करण्याची गरज आहे.

  • हवेत व पाण्यात मिसळणारे घटक

ई कचऱ्याची शास्त्राrय पध्दतीने विल्हेवाट न लावल्यास क्लोरिन, सल्फर डाय ऑक्साईड, क्लोरिनेटेड डायोक्सिन, पॉलिक्लिनिक एरोमॅटिक हाटड्रोकार्बन्स्, बेरिलियम कॅडियम आदी विषारी घटक व वायूंचा वातावरणात भडीमार होतो. हे घटक पाणी व हवेत सहज मिसळतात. यामुळे मानवी तसेच प्राण्यांच्या आरोग्यावार दृष्य व अदृष्य असे विघातक परिणाम होतात. श्वसनाचे आजार, डोळे दुखणे, अस्वस्थ वाटणे आदी रोगांस निमंत्रण मिळत आहे.

  • -कचरा म्हणजे काय?

खराब झालेल्या सीडी, वायर्स, कॉम्प्युटर, फ्रिज, .सी. मोबाईल, आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व त्यांच्या सुट्या भागापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यास शास्त्राrय भाषेत ई वेस्ट (-कचरा) असे संबोधले जाते.

विशेष मोहिम राबवून दोन ते तीन महिन्यातून कॉलेजेस, ऑफीसमधून ई वेस्ट कचरा गोळा केला जातो. यासाठी शहरात 13 ठिकाणी ई वेस्ट संकलन पेंद्र उभारले आहेत. ई कचऱ्याचे रिसायकलींगसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्यांना हा कचरा दिला जातो. त्यासाठी मनपाला कोणताही खर्च येत नाही.

                                                                     विजय पाटील, मूख्य आरोग्य निरिक्षक, महापालिका

Advertisement
Tags :

.