मंत्रिमंडळ स्थापनेचे आव्हान
पहिल्या टप्प्यातच मंत्री होण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांमध्ये चुरस : मंत्र्यांच्या यादीसाठी दिल्लीत आज वरिष्ठांची बैठक
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सहजपणे करणाऱ्या काँग्रेस हायकमांडसमोर आता मंत्रिमंडळ स्थापनेचे आव्हान उभे ठाकले आहे. बुधवारी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या डी. के. शिवकुमार यांच्यासोबतच मंत्रिमंडळ स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात 8-10 मंत्र्यांना स्थान देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला होता. पहिल्या टप्प्यात मंत्री होण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चुरस लागली असून आता मंत्रिमंडळ स्थापना हायकमांडसाठी एक आव्हान तसेच डोकेदुखी बनली आहे.
शनिवारी सायंकाळी झालेल्या पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत डी. के. शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल, डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्यांनी मंत्रिमंडळ स्थापनेवर चर्चा केली. परंतु मंत्र्यांच्या यादीचा पहिला टप्पा निश्चित झालेला नाही. शनिवारी सायंकाळीच मंत्र्यांची यादी निश्चित केली जाईल असे म्हटले जात होते. मात्र, ज्येष्ठ मंत्र्यांमधील स्पर्धेमुळे ही यादी निश्चित होऊ शकली नाही. त्यामुळे, मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया आता पुन्हा हायकमांडच्या दरबारात पोहोचली आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला निरीक्षक म्हणून आलेले रणदीप सिंग सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनी भावी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीत येऊन वरिष्ठांच्या उपस्थितीत मंत्र्यांची यादी निश्चित करण्यास सांगितले आहे. याला डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी सहमती दर्शवली आहे. मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात, डी. के. शिवकुमार सोमवारी दिल्लीला रवाना होतील. सिद्धरामय्यांनाही वरिष्ठ नेते दिल्लीला बोलावून दोघांशी चर्चा करून अंतिम स्वरुप दिले जाईल. सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीला रवाना होण्याची शक्मयता आहे. मंत्र्यांची यादी अंतिम करण्यासाठी सोमवारी दिल्लीत वरिष्ठांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बुधवारी, ज्येष्ठ नेते डॉ. जी. परमेश्वर, रामलिंगा रे•ाr, के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, के. एच. मुनियप्पा, ईश्वर खंडे, जमीर अहमद खान, यू. टी. खादर आणि चेलुवरायस्वामी हे डी. के. शिवकुमार यांच्यासोबत शपथ घेणार होते. परंतु पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाच्या इच्छुकांमध्ये चुरस वाढल्याने यादी अंतिम करणे हे हायकमांडसाठी डोकेदुखी बनले आहे. त्यामुळे, मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरुप देण्यास विलंब होत असून मंत्र्यांच्या यादीचा पहिला टप्पा मंगळवारी अंतिम केला जाईल. 12 ते 14 ज्येष्ठ मंत्री शपथ घेण्याची शक्मयता आहे.
16 जूनपर्यंत पूर्ण मंत्रिमंडळ स्थापन होणार
3 जून रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि मंत्र्यांच्या पहिल्या टप्प्यातील शपथविधीनंतर 16 जूनपर्यंत पूर्ण मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल. हायकमांडने सर्व प्रादेशिक आणि जातीय प्रतिनिधित्वाचा विचार करून मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून शक्मय तितक्मया नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील 15 ते 17 जणांना पुन्हा मंत्रिपद मिळणे कठीण आहे.