For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्र सरकारची ‘एक्स’ला नोटीस

06:22 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
केंद्र सरकारची ‘एक्स’ला नोटीस
Advertisement

‘ग्रोक-एआय’मधून अश्लील मजकूर काढून टाकण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ला नोटीस पाठवत ‘ग्रोक-एआय’मधून अश्लील सामग्री काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी सरकारने कंपनीला 72 तासांत अहवाल सादर करण्यासही बजावले आहे. शुक्रवार, 2 जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात ‘एक्स’च्या ‘ग्रोक-एआय’ तंत्रज्ञान वापरून तयार केलेली सामग्री त्वरित काढून टाकावी, असे निर्देश दिले. सदर निर्देशांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या जनरेटिव्ह एआय चॅटबॉट, ग्रोकचा गैरवापर वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने कडक पवित्रा घेतला आहे. वापरकर्ते सदर संदर्भांचा वापर अश्लील सामग्री तयार करण्यासाठी करत आहेत. या वाढत्या ट्रेंडमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळेच भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (आयटी मंत्रालय) कठोर कारवाई करत ‘एक्स’ला त्यांच्या ‘ग्रोक-एआय’ तंत्रज्ञानाचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात केलेली कोणतीही कारवाई किंवा आढावा 72 तासांच्या आत केंद्र सरकारला कळवावा असे निर्देश सरकारने दिले आहेत.

Advertisement
Tags :

.