For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्राने आवळल्या ओटीटीच्या नाड्या

06:28 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
केंद्राने आवळल्या ओटीटीच्या नाड्या
Advertisement

पाच अश्लील अॅप्स बंद : 100 मालिकांवर बंदी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ओटीटीच्या माध्यमातून दाखविल्या जाणाऱ्या आपत्तीजनक आणि अश्लील दृष्यांविरोधात केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. अश्लील आशय दाखविणाऱ्या पाच अॅप्सवर बंदी घालण्यात आली असून 100 हून अधिक मालिकाही बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अश्लील आशय दाखविणाऱ्या या माध्यमांना अनेकदा नोटीस आणि इशारे देण्यात आले होते. तथापि, त्यांच्यात सुधारणा न झाल्याने अखेर ही बंदी घालण्याचा निर्णय झाला.

Advertisement

अशी आक्षेपार्ह दृष्ये असणाऱ्या मालिका किंवा चित्रपट दाखविले जाऊ नयेत, असा आदेश केंद्र सरकारने इंटरनेट सेवा देणाऱ्या सर्व पुरवठादार कंपन्यांना केली आहे. हा आदेश अश्लीलता विरोधी कायदे आणि माहिती तंत्रज्ञान नियमांच्या अंतर्गत देण्यात आला आहे. राष्ट्रीय हितांची सुरक्षा करणे, तसेच डिजिटल माध्यमांवर नैतिक बंधने लागू करणे, ही या नियमांची प्रमुख उद्दिष्ट्यो आहेत.

पूर्वीही केली होती कारवाई

गेल्या वर्षी जुलै महिन्यातही केंद्र सरकारने ओटीटी आणि इंटरनेवरील अनेक अॅप्स आणि मालिकांवर अशी कारवाई केली होती. या सर्व माध्यमांनी भारतातील कायद्यांचे सरसकट उल्लंघन केल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कृती करण्यात आली आहे.

थीम किंवा सामाजिक संदेश नाही

ज्या अॅप्स किंवा मालिकांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांच्यातून केवळ अश्लील आशय दाखविला जात होता. त्यामागे कोणतीही थीम किंवा सामाजिक संदेश देण्याचा हेतू नव्हता. समाजाचे प्रबोधन करण्याचाही प्रयत्न त्यांच्यातून दिसून येत नव्हता. त्यामुळे अशा मालिका आणि अॅप्स समाजहिताच्या दृष्टीने घातक असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

पुन्हा प्रारंभ झाल्यामुळे कारवाई

मागच्या वेळी जुलै महिन्यात ज्या अॅप्स आणि मालिकांवर बंदी घालण्यात आली होती, ती अॅप्स आणि मालिका नव्या मथळ्यांच्यासह पुन्हा दाखविण्यात येऊ लागल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आणून देण्यात आले होते. केंद्र सरकारने या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर त्यांच्यात तथ्य असल्याचे आढळले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही अधिक कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.