प्रवासादरम्यान वाहकाचे हृदयविकाराने निधन
03:29 PM Feb 20, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
संगमेश्वर :
Advertisement
करजुवे ते संगमेश्वर एसटी घेऊन येणाऱ्या वाहकाचे प्रवासादरम्यान आलेल्या तीव्र झटक्याने निधन झाले. कर्तव्य बजावत असताना झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुकाराम कुंडलिक माने (४०, मूळ अंबेजोगाई बीड, सध्या रा. देवरुख) असे त्यांचे नावं आहे. याबाबत एसटी चालक मनोहर बालाजी कोपनर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. चालक मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम माने हे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.१५ वा. संगमेश्वरला येत असताना धामापूर घारेवाडी येथे माने यांना छातीमध्ये दुखू लागले. त्यांना तत्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. संगमेश्वर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.
Advertisement
Advertisement