For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैलाला धडकल्यावर कारचे झाले दोन हिस्से, 2 जणांचा मृत्यू

06:03 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बैलाला धडकल्यावर कारचे झाले दोन हिस्से  2 जणांचा मृत्यू
Advertisement

बनासकांठा: गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात महामार्गावर झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. एका बैलाला धडक दिल्यावर भरधाव रेंज रोव्हर डिस्कव्हरी कार अनियंत्रित होत दुभाजकाला धडकली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मालपूरनजीक घडली आहे. आलिशान रेंज रोव्हर कार राजस्थानच्या दिशेने जात असताना अचानक एक बैल महामार्गावर आल्याने चालकाला सावरण्याची संधी मिळाली नाही. बैलाला धडकल्यावर चालकाने वाहनावरील नियंत्रण गमाविले होते. ही टक्कर अधिक तीव्रतेची असल्याने कारचे दोन वेगवेगळे हिस्से झाले. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावर फिरणाऱ्या भटक्या गुरांची समस्या चर्चेत आली आहे. अत्यंत सुरक्षित मानली जाणारी आलिशान कार देखील या दुर्घटनेत पूर्णपणे नष्ट झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.