महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कठड्यावरून खोल ओहोळात कोसळली कार

06:05 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दैव बलवत्तर म्हणून पती-पत्नी सुखरूप

Advertisement

प्रतिनिधी/ धारबांदोडा

Advertisement

कुत्रेकोंड-मोले येथे कारला झालेल्या स्वयं अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून नवरा - बायको जीवावर बेतलेल्या भीषण प्रसंगातून आश्चर्यकारकरित्या बचावली. कुळे येथून मोलेच्या दिशेने निघालेल्या आय टेन या कारसमोर अचानकपणे श्वान आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व बाजूच्या साकवाच्या कठड्याला धडक देऊन कार थेट खोल आहोळात कोसळली. एवढ्या उंचावरून खाली पाण्याच्या डोहात कोसळूनही वाहनातील पती-पत्नी चमत्कारिकपणे बचावली.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल येथील अभिषेक गोराय व त्यांची पत्नी दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी ताळगांव पणजी येथील मित्राची जीए 07 एन 5702 या क्रमांकाच्या कारगाडीने कुळे येथे आली होती. पण सध्या येथील पर्यटन हंगाम बंद असल्याने माघारी फिरत असताना वाटेत हा अपघात झाला. या अपघातातून सुरक्षित बचावलेला अभिषेक हा दरीतून वर आल्याने लोकांना हा प्रकार कळला. अन्यथा तेथे कार कोसळल्याचे सहसा कुणाच्याही लक्षात आले नसते. विशेष म्हणजे साकवाचा कठडा ओलांडून कलटी न होता कार सरळ तोंडाने ओहोळात कोसळली. जर कार कलटी झाली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. अपघाताची माहिती मिळताच कुळेचे सरपंच गोविंद शिगांवकर, पंचसदस्य अजय बांदेकर व बेनी आझावेदो यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ऊग्णवाहिका पोहचण्यास उशिर झाल्याने अजय बांदेकर यांनी आपल्या कारमधून दोघाही पती पत्नींना पिळये-धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. हवालदार दीपक गावस यांनी घटनेचा पंचनामा केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article